| |
।। आप्पाच्यावाडीची अमावास्या ।।
आमच्या घराण्यात ही अमावस्येची सेवा श्री शंकरराव शिपूरकर मामा यांनी सुरू केली त्याची महती थोडक्यात अशी -
गोविंदपंत उर्फ दादाना तीन मुले व तीन मुली थोरले व्यकटेश उर्फ बाबूराव मधले शंकरराव व धाकटे आप्पाराव या तिघांनी या परंपरेला बळकटी आणण्यासाठी आपले आयुष्य वेचले मधले जे शंकरराव अपत्याला दत्तक म्हणून ते शिपूरकर झाले. 1932 साली दत्तक गेले. पण शिपूरचे उत्पन्न ताब्यात आले नव्हते. शिपूर हे गांव इचलकरंजी संस्थानामधले, त्यांच्या भाऊबंदांनी परगोत्रज्ञतील 'दत्तक' असलेले वारस मंजूर होऊ नये असा कोर्टाकडे अर्ज केला होता. ते काम खालच्या कोर्टातून कोल्हापूरच्या उच्च न्यायालयात गेले होते. 5 जून, 1943 रोजी गोविंदरावांनी पार्थिव देह दूपारी 3 वाजता ठेवला. त्या आधी सकाळी त्यांना शंकररावांनी बोलावून सांगितले की 'शंकर ! तुझे काम तुझ्यासारखे होते असे ते काम झाल्यावर दर अमावस्येस श्रीक्षेत्र आप्पावाडीस जात जा ते शंकरमामांनी मान्य केले पुढे 19 साली शंकरमामांचे काम झाले आणि 50 एकर जमिनीचा त्यांनी भर पिकावर कब्जा घेतला.
कारीकोळला झालेल्या आदेशाप्रमाणे ती शंकरमामांनी (आबानी) दर अमावस्येस जाणेचा निर्णय घेतला. कुरूंदवाडलापरत आले. आता रहायचे कोठे, जायचे कोठे, करायचे काय हा मोठा प्रश्न जळीत झालेल्या कुरूंदवाडला श्री. पलुसकरांनी काढलेल्या अन्नसत्रात दिवस काढले. त्यानंतर आबांचे थोरले काका श्री. व्यंकटेश उर्फ बाबूराव यांच्या बोलण्यावरून त्याचेकडे पंधरा दिवस महिनाभर राहून सरकारकडून मिळणाऱ्या कर्जात अनंत अडचणी आल्या. पण ती शंकरमामांच्या ओळखीने थोडेसे मिळाले. शंकरमामांची मेहूणी ति ताई गोकाक कागलला रहात होती तिच्या बोलण्यावरून कागलला जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आणि ते 1948 साली कागलला गेले. गेल्या गेल्या त्यांनी चैत्राची अमावस्येस सुरूवात केली. ते स्वतः डबा घेऊन जात व देवासमोर बसून भजन करीत व डबा जेवून परत जात असत. तास दोन तास तिथे थांबत. त्यामुदतीत कोणी त्यांना संसारातील अडचणी सांगे, त्यांना ते उपाय सुचवीत खेड्यातील लोकांच्या पुष्कळवेळा अंधश्रध्दा राहत असत. त्या अंधश्रध्दा नाहीशा करण्याचा प्रयत्न करीत. व्रत, वैकल्ये, जारण मारण, उच्चाटन, अंगारा देणे, धुपारा देणे, निपुत्रिकाला पुत्र होण्यासाठी काही कूर गोष्टी करायला लावणे. या कशातही खरा परमेश्वर नसून तो अशापासून शेकडो मैल दूर आहे.इतकेच नव्हे तर खरा परमेश्वर, कल्पवृक्षात नाही, कामधेनूत नाही, नव्हे नव्हे मोक्षातही नाही. परमेश्वराला शोधायला कुठे रानावनात जावे लागत नाही. एका पायावर उभारून तपश्चर्या करायला लागत नाही.
ठायीच बसून करा आळवण । न लगे जावे लागे वनांतरा ।
सुखे येतो घरा नारायण । हा संत आग्रह आहे. हा त्यांच्या आदेशाच्या मतितार्थ होता.
हा अमावस्येचा वेलू आज गगनावर गेला आहे. दर अमावस्येला पाच हजार माणसांना अन्नदान होते अनेकांना मार्गदर्शन होते. अनेकांना दिलासा मिळतो. अनेकांची नाथसेवेमुळे संकटे दूर होतात. त्यामुळे हे एक सुशिक्षित अशिक्षित, श्रीमंत, गरीब यांचे श्रध्दास्थान आहे. ती शंकरमामाच्या कारकीर्दीत अनेक चमत्कार घडले आहेत. ते सगळे बव्हशाने सांगायचे म्हणजे एक वेगळे पुस्तक काढावे लागेल. वानगीदाखल एकच सांगतो. ती नाना पाच्छापूरकर नावाचे गृहस्थ ती शंकरमामांच्याकडे येत असत. त्यांचे मेहूणे श्री. भाऊसाहेब खा हे एस. टी.मध्ये नोकरीत होते. त्यांना पाच भाऊ, त्यांच्या मालकीचे एक बेळगांव गणपती गल्लीत गण खाजगी देऊळ आहे. त्यांच्या वडीलांनी ते खाजगी देऊळ असल्याचे सुप्रीम कोर्टात केस करून ते खासगी असल्याचे सिध्द करून घेतले. पुढे ते वृध्द झाले. चार पाच मुले नोकरीच्या निमित्ताने दिशेला गेलेली. गणपतीची आबाळ होऊ लागली. त्यातील एका मुलाची भाऊसाहेबाची बदली बेळगावला झाली. त्यांना असा अनुभव येऊ लागला की घरात घराची शांतता असते ती अजिबात नाही, कितीही पैसा आला तरी तो पारमूस व्हायचा घरात सारखं आजारपण असायचे. ते एकदा आपले श्री. नानासाहेब पाच्छारपूरकर यांना बोलले ते म्हणाले आपण 'शिपूरकर मामांना विचारू झाले आले ती मामांनी त्यांना चार सहा दिवसांत येणाऱ्या अमावस्येस येण्यास सांगितले. ते अमावस्येस आले.
भाऊसाहेब मामांच्या समोर बसले असताना ती मामांनी आपल्या नेहमीच्या पध्दतीप्रमाणे भंडारा बघून विचारले की 'तुमच्याकडे देऊळ आहे का?' भाऊसाहेब म्हणाले 'होय आहे' वडिलोपार्जित खाजगी देऊळ आहे. त्यांची पूजा होते का? मामांनी विचारले. 'होते भाऊसाहेब म्हणाले, 'तुम्ही गणपतीची पूजा करत नाही. आहात. तुम्ही गणपतीच्या कवचाची पूजा करता आहात तो योग निद्रेतून जागा आहे. तो म्हणतो 'मला बाहेर काढा म्हणजे मी तुम्हाला बाहेर काढीन भाऊसाहेब भांबावून गेले. मला याचा काही बोध होत नव्हता असे ते म्हणाले, त्यावर मामा म्हणाले, 'तुम्ही सध्या पूजा करत आहात ती गणपतीवरच्या कवचाची, खरा गणपती तो आत आहे. ते कवच काढायला हवं' भाऊसाहेब घरी परतले. आपल्या गणपतीच्या देवळात गेले त्यांचेकडे वंश परपरेने कोनाडा रंगविण्यास पेंटर होता तो कोनाड्यातील त्या गणपतीला सिंदूर लावायचा. त्यावेळी मूर्ती गणपतीचा आकार घ्यायची हे सर्व त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या पेंटरला बोलावले. त्याला हकिकत सांगितली. त्याने प्रथमतः साफ नकार दिला. 'कोण शिपूरकरमामा आप्पाचेवाडीस बसून सागतोय की गणपती कवचाच्या आत आहे म्हणून? आणि नसलाच तर आणि असला मातीचा असला, शहाडूचा असला, त्याचा हात दूखावला सोड दूखावली तर माझा नष्टांश होईल. मी काढणार नाही. भाऊसाहेबांचा मात्र विश्वास झाला होता. होऊ दे माझा झाला तर नष्टांश असे त्यानी निक्षून सांगितले आणि कामाला लागले. बेळगांवचे वे शा सं. दांडेकर शास्त्री यांच्या पौरोहित्याखाली त्यांनी कवच काढायचे ठरविले
देवतात्व पाण्यात उतरवून ठवेले व अॅसिड लावले. ते अॅसिड लावताना लावणा-याचे हात थरथरत होते. एक ढलपा पडला, काही तरी काळे दिसू लागले. सगळे कवच निघाल्यावर आत शाळीग्रामाचा सर्व अलंकारानिशी असलेला, कमरेस सर्पाकृती मेखला ल्यायलेला उत्तम गणपती निघाला. कवचाचे 48 किलो वनज निघाले. कवि गटे जसे डोक्यांवर 'शाकुंतल' घेवून नाचला तसे भाऊसाहेब तेव्हा कवच घेऊन नाचले. त्यातच त्यांना गणपतीचा संचार सुरू झाला. त्यावेळी शंकरमामांचे ज्येष्ठ चिरंजीव मधुकर यांनी गणपतीवर एक गीत लिहिले. 'विनायका तू होई जागृत' म्हणून ते गीत म्हणायला लागले ती भाऊसाहेबांना आज ही संचार होतो. ते कवच 250 वर्षांपासूनचे पेशवे कालीन असावे असे तनयांचे मत आहे. तेथून खासबाग घराण्याची श्रध्दा आधिक दृढमूल झाली व त्यांची आर्थिक भौतिक परिस्थिती सुधारली. सध्या खासबाग मंडळी बुध्द पौर्णिमेला या प्रतिष्ठापनेचा 'वर्धापन' मोठ्या प्रेमाने करताहेत.
श्री दाजीसाहेब शिरगुरकर नावांचे परमानंद वाडीचे सरकार आहेत मनाने अत्यंत ऋजु व निरपेक्ष बुध्दीने ज्याला ज्याला म्हणून मदत करता येईल त्याला त्याला ते सढळ हाताने मदत करीत असतात. असे व्यक्तिमत्व आहे. मी नेहमी म्हणतो की, ते पुल देशपांडेंना भेटले असते तर 'गुण गाईन आवडी या पुस्तकाची दोन तीन पाने वाढली असती पण यांची परिस्थितीच्या तडाख्यानी जी ससेहोलपट झाली होती त्यामुळे एक बेडर वृत्ती झाली होती. 'धर्म श्रध्दा अपासना यावर त्यांचा विश्वास उरला नव्हता. आणि भाग्याने ते मामांच्या संगतीत आले. आणि त्यांचा सारा मनच बदलून गेला. त्यांच्या जीवनात काती झाली तथाकथित अनेक प्रश्न सुटत गेले काही नवीन प्रश्न उभे राहिले. पण ते सोसण्याचे 'धैर्य' त्यांना आपोआप प्राप्त झाले. ते आजतागायत नाथांच्या सेवेत असतात. आता ते प्रसन्नतेच्या ब्रहमानंदात रममाण असतात. |