गोविंदपंत दादा घोसरवाडकर
 
   
  श्री.कै. प. पू. सिध्दपुरूष नाथभक्त गोविंदपंत दादा घोसरवाडकर परंपरा
   
 

चिमड सांप्रदायाचे अधिकारी नारायण महाराज यरगट्टीकर यांनी याथांच्या आज्ञेने माझे ब्रम्हीभूत पणजोबा श्री. प. पू. गोविंदपंत घोसरवाडकर यांना अनुग्रह दिला.
गोविंदपंत घोसरवाडकर एक अवतारी व सिध्दपुरूष होते त्ययांचा जन्म १८७६ साली झाला त्यांच्या वयाच्या आठव्या वर्षापासून त्यांना संचार अवस्था प्राप्त झाली. घोसरवाडचे ग्रामदैवत हालसिध्दनाथ केवळ दुधावर राहत असत. कानडीत हाल म्हणजे दुध म्हणून हे नाव पडले हया देवाचे पुजारी धनगर जातीचे असल्याने त्यांना धनगराचे देव असे संबोधले जाई, पण ते नवनारायणातील चमस नारायण आहेत हे कोणास ज्ञात नव्हते. गोविंदपंताच्या घरातील लोक काटेकोर सोवळे ओवळे पाळणारे दत्ताचे उपासक होते. त्यामुळे दादांचा हा संचार इतरांच्या प्रमाणे तलवारीचा खेळ करणे अगर गुंड पाठीवर मारून घेणे हे त्यांच्या वडीलांना तितकेसे पसंत नव्हते त्यांच्या वडिलांचा त्याला विरोध होता. दत्तगुरूंच्या सरस्वती गंगाधरने लिहलेले गुरूचरित्रातील चमत्काराप्रमाणे गोविंदपंत दादांच्या आयुष्यात कित्येक चमत्कार नाथ महाराजांनी घडवून आणले. त्यामुळे त्यांच्या वडिलादिकांचा त्याच्यावर श्रध्दा बसली आणि आमच्या घरात नाथ भक्ती उदयास आली आणि विकास पाावली दिवसेंदिवस दादांची सिध्दावस्था वाढत गेली त्यांच्याकडे असलेल्या वाचा सिध्दीमुळे आदल्या नदल्यांना त्यांच्या कडून मार्गदर्शन मिळत असे. रंजल्या गांजल्या जिवांना त्याना आपले म्हणून मार्गस्थ करण्याचे काम होवू लागले तसेच पाखंडी व ढोंगी लोकांचा समाचार ही घेतला जावू लागला. त्यामुळे भक्तांची मांदियाळी वाढत चालली घोसरवाड व आप्पाचीवाडी येथील पंचकोशीतील नव्हे तर त्यावेळी आजच्या सारखी वाहने सहज उपलब्ध नसताना पण पुण्या मुंबईचे लोक दादांच्याकडे समस्या घेवून येत असत आणि त्यांना १००% प्रश्नांची उत्तरे मिळत. जगमान्य विव्दान व साक्षात्कारी पुरूष महनीच गुरूदेव रानडे हे गोविंदपंताना सिध्द पुरूष म्हणून संबोधत असत. बम्हविद्वरिष्ठ व सात्विकतेचा स्फटीक असलेले आमचे गुरूवर्य प. पू. दादामहाराज केळकर तर गोविंदपंतांना दहावे नाथ म्हणत असत. गोविंदपंत दर यात्रेस श्री क्षेञ आप्पाचीवाडीच्या यात्रेत खेळण्याचा पहिला मान मिळाला. तो आज पावतो अनुस्यत आहे. आप्पाचीवाडीस पुर्वी नुसता हत्यारांचा खेळ होत होता पण गुंड गोविंदपंतदादांनी विधीपुर्वक घोसरवाडहून आणले व आप्पाचीवाडीस समर्पण केले. त्यावेळेसपासून आप्पाचीवाडीस दोन्ही प्रकारांचा खेळ खेळला जातो.
१९४२ साली यात्रेच्या शेवटच्या दिवशी पालखी कै. लक्ष्मण खोत यांच्या दारी आली असता दादांचा खेळ होत असे तसा तो झाल्यावर पालखी पुढे सरकली आणि ती दादा कपडे घालत असता त्यांना परत संचार झाला आणि ते बसत असलेल्या जागी तक्यावर त्यांनी भंडारा फेकला यावेळी तिथे असलेल्या त्यांच्या मुलांच्या मनाता चर्र झाले . ती दादांनी लक्ष्मण खोतांना बोलावून घेतले आणि सांगीतले की या झाडाचे (संचार येणारी व्यक्ती) हे शेवटचे वर्ष आहे.
"यापुढे माझी मुले व तुम्ही ही परंपरा चालवायची आहे. यातच सर्वाचे कल्याण आहे." तीच ही परंपरा ती दादांची ६० - ६५ वर्षे सेवा आणि त्यानंतर ६७ वर्षे ही सेवा अखंडपणे चालू आहे ती दादांची हत्यार व गुंड खेळण्याची परंपरा त्यांचे थोरले पुत्र ती के बाबुराव उर्फ आणि यांनी त्याच जोमाने चालवली आणि वाढविली आता ती आण्णांचा नातु शरद ही परंपरा सांभाळत आहे दादांचे धाकटे चिरंजीव के आप्पाराव यांची देवावर अटळ श्रध्दा होती आणि आता त्यांचे चिरंजीव अनिल यांचा या परंपरोत अमुल्य योगदान आहे के दादांचे धाकटे बंधू श्रीपादपंत आणि त्यांची मुले, नातवंडे, वंशज यांचा या परंपरेत सिंहाचा वाटा आहे ती दादांचे चुलत बंधू शामराव (शामुकाका), त्यांची मुले, नातवंडे यांची देवावर अटळ श्रध्दा आहे आणि त्यांचाही या परंपरेत सहयोग आहे असेच आजही सर्व घोसरवाडकर मंडळी निस्सीमपणे सेवा करात आहेत या प्रवाहात कालानुरूप काही भोवरे निर्माण झाले, खडे आडवे आले अगर एखादया खडकाने डोकेवर काढले पण त्यासर्वांना पार करत नाथ कपेने हा प्रवाह अक्षुण्णपणे जवे वाहत आहे गोविंदपंतानी सांगीतल्यापमाणे अगदी वार, वेळ, नक्षत्र सांगून देह ठेवला शूर ओळखावा रणी साधू ओळरपावा मराणी या वचनाप्रमाणे ५ जुन १९४३ साली दुपारी ३ वाजता बोलता बोलता नाथांचे नाव घेत देह ठेवला. हाच त्यांच्या सिध्दपदाचा पुरावा. देह ठेवण्याआधीच त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना बोलावून नाथांची ही परंपरा अखंडपणे पुढे चालवा असे सांगीतले त्यांचा मधला मुलगा शंकर माझे आजोबा यास दत्तक घातले होते परगोआतील दत्तक असलेने तो कायदा बाहय आहे असा त्यांच्या विरोधकांचा दावा होता व तो न्यायप्रविष्ठ होता म्हणून त्यांची अवस्था न घटका न घाटका अशी दयनीय झाली होती ती के दादानी माझ्या आजोबांना (शंकर) जवळ बोलावून त्यांचा डोक्यावर वरद हस्त ठेवला आणि नाथ भविष्यवाणी ने बोलते की शंकर तुझे काम सुप्रीम कोर्टात तुझ्या सारखे होणार आहे. ते काम झाल्यांवर माञ तू दर अमावस्येला श्री क्षेत्र आप्पाचीवाडीला जात जा. तिथे तुझ्या तोंडून नाथ महाराजच बोलतील आणि तु सांगशील ते खरे होईल या ब्रम्हवाक्याचे अमृत आपल्या हृदय संपुष्टात कायमचे ठेवले. १९४६ साली ती दादांनी सांगीतल्याप्रमाणे माझ्या आजोबांचे काम झाले त्यावेळी ते कुरूंदवाडला राहत असत त्यामुळे प्रत्येक आमवस्येला त्यांना येणे जम्त नव्हते आणि त्याचाच त्यांना जबरदस्त तडाखा मिळाला १९४८ साली कुरूंदवाड येथे झालेल्या गांधीवधच्या दंग्यात आजोबा आणि त्यांचे कुटुंब होरपळून निघाले एका कपडयनीशीसर्वजण बाहेर पडले उदिग्न मनाने आजोबा कारीकोळ ला गेले आणि देवाला कळकळीची विनंती करून आर्ततेने विचारले असा मी काय गुन्हा केला म्हणून मला ही शिक्षा दिलीस तुझ्या शिवाय मी आता कोणाला दाद मागू इतक्यात देवकृते नावांचा पुजारी शेतातून पळत पळत आला आणि त्याला जोरात संचार झाला त्यांनी आजोबांना शंकर बोलावले आणि विचारले, तुला तुझ्या वडिलांनी दर अमावस्येला आप्पाचीवाडीला जायला सांगीतले होते ना मगगेलास का त्याचे हे फळ आहे याच राखेतून काढुन देतो. तू कागलला जा आणि ताबडतोब आमवस्या सुरू कर शब्दांच्या बरं हुकूम आजोबांनी १९४८ साली चैत्राची आमवस्या सुरू केली. ते स्वतःच डबा घेवून जात देवापुढे बसुन भंजन करत. डब्यातला नैवेदय दाखवून स्वतः भोजन करीत असत. नाथकृपेने माझ्या आजोबांना ती के. दादांनी सांगीतल्याप्रमाणे त्यांना वाचासिध्दी प्राप्त झाली हळूहळू भक्त मंडळी गोळा होवू लागली आणि हा आमवस्येचा प्रपंच वाढला त्या अनुषंगाने सांवत्सरीक यात्रा ही फोफावली.
ही परंपरा श्री नाथांच्या हुकूमान्वये आजता गायत वर्धिष्णू व उर्जस्वल रीतीने संपन्न होत आहे. ती .श्री.गोविंदपंतदादा घोसरवाडकर यांच्या आदेशप्रमाणे माझे आजोबा श्री. नाथ भक्त श्री. शंकरमामा शिपूरकर यांनी *१९४८ साली अमावस्या सेवा आणि अन्नदान सेवा अप्पाचीवाडी येथे सुरू केली. ३२ वर्षे शंकरमामा शिपुरकर यांनी आणि माझे वडील नाथ भक्त श्री मधुकर शिपूरकर यांनी ही सेवा ४२ वर्षे केली.* आज ही नाथ महाराजांच्या कृपेने अमावस्या सेवा अखंड चालू आहे. शेकडो लोकांना मार्गदर्शन मिळते आणि साधारण ४०००-४५०० भक्तांना अन्नदान होते. गोविंदपंत दादा यांच्या पासून सुरू झालेल्या ह्या परंपरेला साधारण १५० वर्षे झाली.

गोविंदपंत दादा घोसरवाडकर - पुस्तक : Click Here
Copyright © 2026. All rights reserved.
मुख्य पान | श्री हालसिध्दनाथ | आप्पाचीवाडी / कुर्ली | करीकोल | घोसरवाड | चिमड संप्रदाय | गोविंदपंत दादा घोसरवाडकर | शंकरमामा शिपूरकर | अमावस्या परंपरा | भक्त अनुभव | चित्रसफर (फोटो गॅलरी) | संपर्क