पुढे सिध्द पुरूष म्हणून ओळखले जाणारे गोविंदपंत घोसरवाडकर शंकरमामांचे 'पिताश्री गोविंदपंतांना वयाच्या आठव्या वर्षापासून हालसिध्दनाथांचा संचार होता. त्यांनी दैवी सामर्थ्यावर त्यांच्या आई वडिलांचा असलेला विरोध मोडून काढला होता. नवनारायणाची आठव्या म्हणजेच सत्य नारायणाचा हा अवतार असून जगोध्दारासाठी ते भूतलावर अवतरले आहेत. गुरूचरित्रात वर्णन केलेल्या काही चमत्कारासारखे चमत्कार गोविंदपंताच्या द्वाराना यांनी करून दाखविले.
एकदा गोविंद पंतांना संचार झाल्याने त्याना तीन मुलांच्या बापाला बोलावले म्हणजे आपल्या पिताश्रीनाच बोलावले, कारण गोविंदपंतांना दोन धाकटे भाऊ होते. 1 बाळाजी पंत 2 श्रीपादपंत म्हणून ते तीन मुलांचे वडील त्यांना बोलावून एक भविष्यवाणी सांगितली.
अरे तुझया पहिल्या पाळण्याची दोरी बळकट आहे, शेवटच्या पाळण्याची दोरी बळकट आहे, मात्र मधल्या पाळण्याची दोरी तुटली आहे बघ,' दादा म्हणजे पहिला पाळणा त्यांचा वंष अनुस्यूत झाला. धाकटे श्रीपादपंत त्याचा ही वंष अबाधित राहिला पण मधला बाळाजीपंतांना काही मुळबाळ झालेले नाही, त्यामुळे तो वंष खुंटला. ती दादांच्या चुलत घरण्यांत देखिल तीन भाऊ पहिले विष्णुपंत, दुसरे गणपतराव, तिसरे शामराव मधल्याचा वंष नाही.
नियतीची गंमत बघा खुद्द गोविंदपंतांना तीन मुले (1) व्यंकटेष 2) शंकर 3) आप्पाराव. शंकर हे मधले. देवांचे भक्ति स्मरणांत ठवून की काय कोणास ठाउक त्यांनी शंकर या आपल्याच आत्यांना दत्तक घातले आणि गाडीने रूळ बदलला. शंकरराव यांना आत्या आपण 'शंकरमामा' म्हणू ते मामा कसे झाले ते देखिल ओघांत सांगितले जाईलच.
शंकरमामांचा जन्म 9.11.1909 साली झाला. त्याचे पिताश्री गोविंदपंत घोसरवाडकर घोसरवाडकर सरकारांच्याकडे कारकून होते. पुढे मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून त्यांनी आपले बिऱ्हाड सांगलीस केले होते. सांगलीस पांजार पोळांत रहात असे तिथे दररोज संथपदी तिथे चालत होती. शंकरमामांची तिथे मुंज झाली गाईच कळपांत त्यांची 'मुंज' झाली होती. त्यामुळे त्याला एक अनामिक पावित्रय व मांगल्य प्राप्त झाले होते.
पुढे मामांना 1993 साली गोविंदपंतांच्या गंगुबाई नांवाच्या बहिणीला दत्तक दिले. पण हा 'दत्तक' गंगुबाईच्या सासरच्या लोकांना मान्य नव्हता. कारत ते परगोत्रातला मुलगा होता म्हणून. घोसरवाडकरांचे गोत्र 'जमदगि' तर षिपूरकरांचे "भारद्वाज" आणि भाऊबंदांतील असून प्रतिस्पर्धी होते 'रामचंद्र गुंडो कुलकर्णी, षिपूरकर ? त्यांनी शं.भा. गंगुबाईची षिपूर आणि अर्जुनी येथील 50 एकर फुकट जमिन हडप केली व त्याचे उत्पन्न आयते घेत राहिले. षिपूर हे त्यावेळी इचलकरंजी संस्थानातील गांव त्यामुळे 'कोर्टात' केस घातली. पण दुदैवाची गोष्ट अषी होती की इचलकरंजीच्या घोरपडे सरकार यांचे कारभारी श्री लाटकर हे प्रतिस्पध्याचे आईचे वडील म्हणजे प्रत्यक्ष सरकारांच्या कारभाऱ्या विरूध्द दालदा होता. त्यामुळे वकिलपत्र देखिल घ्यायला कोण तयार नव्हते. बरं इकडे जनकं घराण्याची आर्थिक परिस्थिती यांना मदत करावी अषी नव्हती किंबहुना जनक घराण्यातील स्थावर जंगमावर दत्तक गेल्यामुळे काही अधिकार नव्हता आणि दत्तक वडील पॉपर्टी अषी कोर्टात अडकलेली त्यामुळे मामांची स्थिती 'ना घरका, ना घाटका' अषीच होते.केवळ देवावरील मामांची अटळ श्रध्दा ज्योतिषषास्त्र अभ्यास व वडीलांचा आषिर्वाद या जोरावर मामांनी पन्नास एकर जमिनीचा भरपिकावर कब्जा मिळविला. त्याचा सारा इतिहास म्हणजे एक रोमहर्षक कहाणी आहे. त्यावर एक पुस्तकच लिहावे लागेल जिज्ञासुनी 'मधुसंचय' वाचावे द्ध. या संदर्भात दोन हकिकती सांगायलाच हव्यात त्यांच्या पुढील जीवनाच्या दृष्टीने कलाटणी, ज्नतदपदह च्वपदजद्ध देणार आहेत.
मामांचे वडील एक सिध्द पुरूष होते. त्यांना आपले अवतार कार्य केव्हां संपणार आहे हे अगोदर एक वर्ष कळले होते. शूर ओळखावा रणीं, साधु ओळखावा मरणी, अस म्हणतात. शूराचे शूरत्व रणांगणात कळते. साधुचे साधुत्व / सिध्दत्व त्याचे मरणांनी कळते. दादांनी 'गोविंदपंतांनी' आपले निर्याण एक वर्ष आधि सांगितले होते. 1942 साली ऑक्टोंबर महिन्यातील श्री होय. आप्पाचेवाडीची यात्रा फुटली दोन्ही पालख्या 'कुर्ली व आप्पाचेवाडीची' निघाल्या. शे-दोनषे ढोलवाले लहान मोठे ढोल बांधून परतीच्या प्रवासाला निघाले. प्रथम लहान मुलांनी वाद्य केले. लहानसे ढोल नंतर त्याहून मोठ्या मुलांचे ढोल त्या मागे नेहमीचे मोठी ढोलवाले अषी चाललेली दिंडी असते. सदरेपासूनचा रस्ता तसा अरुंद आहे. जेव्हां पालखी सदरेच्या मंडयांत असते त्यावेळी, शेवटच्या ढोलवाला छोकरा लक्ष्मण खोतांच्या दमलेल्या चेहरयाने डुलत डुलत जात असतो. त्यांचेमागे असलेली ती ढोलांची रांग त्याबरोबर असलेल्या 100-150 छत्रा, देवाची घोडी, बकरी दिवटीवाले, भंडारयाने माखलेल्या कपडयानिषी बेभान झालेले इतर भक्त हे त्या अरुंद रस्त्यावरून येत असतांना लांबून नदीच्या पात्रामागे, रस्ता भरून वाहतो आहे असेच वाटत होते हे दृश्य अतिषय विलोभनीय दिसते. 'ऐसा सोहळा स्वर्गी नाहीं' असेच तुकारामाप्रमाणे म्हणावे लागेल. जेव्हां पालखी श्री लक्ष्मण खोतांच्या घरासमोर येते. त्यावेळी तिथे दादांचा गोविंदपंत हत्याराचा खेळ होत असे. नेहमीप्रमाणे तो तसा झाला. 1942 साली आणि पालखी पुढे निघून गेल्यावर दादांना परत संचार झाला नाचत नाचत श्री रघु खोतांच्या सोप्यावर येवून 'दादांनी ते ज्या तक्याला टेकून बसत असलेल्या तक्यावर भंडारा टाकला आणि ते पाहिलेल्या लोकांच्या मनांत 'चर्र झाले. संपारांव दादांनी लक्ष्मण खोतांना बोलावून घेतले तसेच आपल्या तीन मुलांना बोलावून घेतले आणि सांगितले की हे झाडाचे 'संचार झालेल्या व्यक्तीचेद्ध शेवटचे वर्ष आहे. पुढच्यावर्षी मी येणार नाही तरी ही पंरपरा खोत तुम्ही व थाटूया तीन मुलांनी मिळून चालवायची आहे. श्री लक्ष्मण खोत प्रथम माझ्या वाटणीप्रमाणे करेनं म्हणाले तेंव्हा नाथांनी निरखून सांगितले की नाही तू पढे होवून करायला हवेस त्यांत तुझे कल्याण आहे तसे त्यांनी लक्ष्मण खोतांकडून वचन घेतले आणि स्वारी स्वार झाली. पुढे दादांनी नेहमी म्हणत असत आतां 6 महिने राहिले 4 महिने 2 महिने या जून महिन्यांत 5 तारखेला दुपारी तीन वाजतां मी अनंताच्या प्रवासाला जाणार आहे. 5 जूनचा दिवस उजाडला त्यांचे धाकटे चिरंजीव पाठ दाबत होते. थोरले संडासला न झाले ते डॉक्टरच्याकडून औषध मामांच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले शंकर तुझे सुप्रिम कोर्टातील काम तुझ्या सारखे होतेय. मात्र एक कर हे काम झाल्याबरोबर तूं दर अमावस्येस श्री क्षेत्र आप्पाचेवाडीस जात जा ! चुकं नकोस आणि 5.6.1943 रोजी बरोबर 3 वाजता 'दुपारी' देह ठेवला. साल, महिना, तारीख व वेळ सांगून असा देह ठेवणारा सिध्द पुरूष मी पाहिला तर नाहीच पण ऐकला पण नाही कुठल्या उच्च कोर्टातील हा सिध्दयोगी असला पाहिजे याची आतां आपल्याला कल्पना येते.
या सिध्दपुरूषाच्या सांगणेप्रमाणे शंकरमामांचे सुप्रिम कोर्टातील काम झाले ते साल होते 1946 व आणि शंकरमामा यांच्या इच्छेप्रमाणे वेगळे झाले. 1947 साल गडबडीत व नविन संसाराची घडी बसविण्यांत निघून गेले. आणि त्यामुळे श्री क्षेत्र आप्पाचेवाडीस अमावस्येस जाता आले नाही आणि आणि काय 1948 साली गांधविधा नंतर जो दंगा उसळला त्याचा न कळत मामां 'बळी' झाले. भाड्याने नविन घेतलेले 'घर अक्षरशः बेचिराख झाले. मामा 'चिन्हभिन्न' झाले. काय करावे काही कळेना एका कपडयानिशी बाहेर पडलेल्या मामांना कांही दिवस कुरूंदवाडला पलूसकरांनी घातलेल्या अन्नछत्राचा आश्रय घ्यावा लागला. एका सात्विक संतापाने मामा 'काहीकाळ' 'सिध्दापूरहरीस गेले. आणि देवापुढे शून्य मनाने बसून साधु नयनांनी देवाला विचारू लागले "असा काय मी तुझा अपराध केलाय म्हणून मला ही तूं शिक्षा शिक्षा दिलीस? सांग मला सांग! प.प.अच्युतानंद सरस्वती 'श्री टेंबे स्वामी' च्या बरोबर नृसिंह सरस्वतीची पूर्वी प्रत्यक्ष बोलत असे म्हणे तसेच इथे झाले. काही काळ येथील एक पुजारी श्री 'देवकुते आपल्या शेतांत बडिम रचत होता बडीम काय पाप केले असे विचारतोस तर ऐक तुझ्या वडिलांनी तुला तुझे सुप्रिम कोर्टाचे काय झाल्याबरोबर श्री क्षेत्र आप्पाचेवाडीस दर अमावस्येस जा म्हणून सांगितले होते की नाही? गेलास की? त्याचा हा तडाखा आहे. सुखी पाप संन्यासी झाला आहेस याच राखेतून काढून देतो तू कागलला जा व अमावस्या धर" शंकरमामांचे डोळे खाड्ङ्कन उघडले. कागलला शंकर मामांची मेव्हणी श्रीपती गोकांक होती आणि तिने नेमके मामांची अवस्था बघून बोलवले होते. त्याप्रमाणे मामा कागलला गेले 1946 सालची फाल्गुन अमावस्येला व दुसऱ्या दिवशीच्या पाडण्याला मामा गेले व तेथून दर अमावस्येचे त्यांनी व्रत धरले त्यावेळी परिस्थिती मोठी बिकट होती. षिपूरच्या जमिनी जबरदस्तीने गुंडांना पेरल्या होत्या व कुरूंदवाडला जाळपोळीतील लोकांना थोडेफार कर्ज मिळत होते. मामांच्या ओळखिने मिळाले. कुरूंदवाडहून कागलला तरी कसे जायचे? त्यावेळी सध्यासारखी पेट्रोलची टंचाई होती. सार्वजनिक वहाने कमी होती आणि मामांची शशी नावाची मुलगी नुकतीच 'ट्रायफॉईड' मधून उठली होती. तिला स्पेशल गाडीशिवाय नेता येणार नव्हते. कसे जायचे एक यक्ष प्रश्न होता पण मामांचा लोकसंग्रह एवढा मोठा होता की मामांच्याबददल वाटणारा 'जिव्हाळा मामांच्या कामी आला कुरूंदवाडचे 'एल पी साहेब की जे पोस्ट मास्टर जनरल होते. त्याची गाडी हाती ती गाडी एन पी साहेबांनी देवू केली आणि कागलला येण्याचा प्रश्न सुटला. कागलला मामां एक वर्षभर आपल्या कुटुंबासह मेव्हणीकडे आश्रितासाठी राहिले त्यावेळी एप्रिल 1948 साली मामांना मुलगा झाला. पुढे हळू हळू शेती ताब्यात आली गाडीच्या निःश्वास टाकला. कागल गांवामध्ये हळू हळू त्यांच्या ओळखी होवू लागल्या त्यांच्या जोतिषशास्त्राच्या ज्ञानाचा लोकांना अनुभव येऊ लागला कित्येक त्याच्यातील दैवी शक्तीमुळे लोकांना त्यांचेबददल आदर वाटू लागला यातील एक महत्वाची घटना म्हणजे कागलमधील प्रसिध्द वकील श्री 'नाडगोंडे यांची ओळख झाली ते ही मामांच्यासारखे गांधी वधाच्या आगीत होरपळले होते.' दुः खीच सहाय होतो दुःखात दुःखिताला या न्यायाने त्यांनाही मामांच्याबददल सहानुभूती वाटली. घरोबा वाढला त्यात नातेसंबंध निघाला श्री रावसाहेब नाङगोंडे यांची पत्नी सौ इन्दुताई ही मामांची सखी भाची-बहिणीची मुलगी त्यामुळे ती यांना 'मामा' म्हणू लागली आणि शंकरमामा- 'शिपूरकर मामा' झाले.
पुढे 'मामा' नाडगोंडे यांच्या घरासमोरील श्री आळतेकर यांचे घरी रहायला आले. त्यांच्या मुलांची नाडगोंडे यांची घरी ये-जा होवू लागली. नाडगोंडे यांचे एक आदर्ष एकत्र कुटुंब होते. तीन कतृत्ववान सुशिक्षित व सुसंस्कारित कर्ते पुरुष त्यांचे वडिल व काका त्यांच्या देवधर्म, कुलाचार, कुळधर्म सांभाळणार व वादातील सलोख्याने राहणारया आर्य स्त्रिया त्यांची मुले-बाळे नोकर चाकर येणे जाणे घरातील एकता हसत मुखाने सांभाळणारया व अथिती देवो भव अषा भवना बाळगणारया स्त्रियांनी उजळलेले ते घर होते. वडीलधारी माणसाबदद्ल आदर व लहानांबदद्ल परमावधीचे वात्सल्य थोरांच्या लहानांच्या वागण्यातून निथळत होते. अशा सुसंस्कारित व शिक्षणची ओढ असणाऱ्या त्यांच्या मुला बाळांत मामांची मुले सहवासात आली व त्यांना एक वेगळे 'एक्सपोजर मिळाले. त्यामुळे त्यांच्याही जीवनाला एक भरजरी पोत लाभला. पुष्कळवेळां मदतीस यायची शिपूर येथील केसरकर नांवाच्या माणसाने मामांच्यापुढे एक अर्धागवायू झालेला माणूस आणून बसविला त्यावेळी 'मामा' शिपूरच्या सरकारी बंगल्यांत होते. 'मामा' नम्रतेने म्हणाले की अरे! डॉक्टर लोकांनी त्याच्यापुढे हात टेकले आहेत तर मी पामर काय सांगणार?" तो म्हणाला "नाही दादा! ममांना शिपूरचे रयत दादा म्हणायचे तुमच्यावर आप्पाचेवाडीचा हालसिध्दआप्पा प्रसन्न आहे. तुम्ही बोलाल त्या उपायाने माझा माणूस बरा होईल तेंव्हा कृपा करा आणि कांहीतरी सांगा" त्यांची ती श्रध्दा पाहून मामांनी देवाचे नांव घेवून सुचला तो उपाय सांगितला. मामा म्हणाले 'हे बघ! याची अर्धांगवायू झालेली बाजू पारवाळाच्या ताज्या रक्ताने चोळायची व नंतर याला गरम पाण्याने आंघोळ घालयची तसे केल्याने हया रुग्णाला सलाम पडले. थोडी थोडी त्याची हालचाल होवू लागली. काही दिवस असे बऱ्यापैकी जाताता न जातात तेवढया मामांच्या पुढे आणखिन् एक संकट उभा राहिले मामांचे जीवन म्हणजे एक व्हेजंबसम त्बम होती.
शिपूरच्या एका कुविख्यात गुंडाने मामांच्या एका प्रामाणिक नोकराला तंबी दिली, "अरे ए ज्या त्या हे बघ त्या बामणाच्या शेतांत जायचे नाही. गेलास तर गुडघ्यातून खाली तुझे दोन्ही पाय काढीन' पण ज्योती 'घाटगे' न डगमगता त्याला म्हणाला "हे बघ बाबू पवार ! मी त्याचे मीठ खातोय् मला जाणं भाग आहे की रे" ज्योती ने पटकापट प्रामाणिकपणाने व धाडसाने सांगितले आणि कागलला मामानी येवून त्याने सांगितले. बाबू पवार परशुरामासारखी कुऱ्हाड खांद्यावर टाकूनच गावांत फिरत होता. त्याच्या धमकीचे गांभिर्य आणि काय? तुकारामाने विठोबाला उददेवून म्हटले आहे "जेथे जातो तेथे तू माझा सांतती' त्याप्रमाणे नाथांनी मामांना एक संधी उपलब्ध करून दिली. त्यावेळचे आय्.जी.पी. श्री मारुतराव कामटे हे पन्हाळयाला आले असतांना त्यांनी मामांना भेटायला बोलावले. त्यावेळी भाषावर प्रांत रचना झाली नव्हती त्यामुळे त्यांची पंचावन्न हजार पोलिसांच्यावर हुकमत होती श्री मारूतराव कामटेच्या पत्नीना कांही मामांना प्रश्न विचारावयाचे होते. त्यासाठी बेळगांवचे डी.एस्.पी. गाडी घेवून मामांना बोलवावयास आले होते मामांनी त्यांना आपली अडचण सांगितली. तेव्हा त्यांनी साहेबांच्या कानावर ही गोष्ट घ् गालायला सांगितली साहेब मिटिंगला गेले असतां मामांनी त्यांच्या पत्नीच्या कानावर ही हकिकत घातली. त्यानी साहेब मिटिंगहूल परत आल्याबरोबर ही हकिकत सांगताच त्यांनी बेळगांवला फोन लावला व त्यांचे नांव सांगून त्याला हदद्घार करायला सांगितले दुसरे बेळगांवहून पोलिसाची एक गाडी आली आणि त्यांनी बाबू पवाराचे काय करायचे म्हणून विचारू लागली मामांनी त्यांना सांगितले की त्याला म्हणजे त्या गंडाला हदद्घार काय करू नका. पण त्याला एका टूकातून काढण्याबांधून गावांतून फिरवा लोकांना कळू दे की मामांचे निष्कारण नांव काढले तर काय होते आणि कांही तरी एक बॉड लिहून घ्या व सोडून द्या आणि असे हे संकट ईष्वकृपेने टळले.
महाराश्ट्राच्या विधान सभेत 'कुळ कायदा' पारित झाल आणि जमिन धारकांनी शेतापासून पांच मैलाच्या आंतच रहायला हवे अशी त्यांत 'अट' होती? धूर्त मामांनी ही बाब फार गंभीरपणे घेतली आणि ठरविले की आपण कागलहून असतील का? त्याचे भाडे परवडेल का? अनेक प्रश्न होते त्याशिवाय नाडगोंडे लोकांचा एवढा जीव जडला होता की ते मामांना सोडायला तयार नव्हते. पण काळाची पावले लक्षांत घेवून मामांचा निर्णय ठाम होता. 1956 साली मामा निपाणीस रहायला गेले. प्रथम चिमगांवकर गल्लीतील श्री इस्लामपुरे यांच्या घरी रहायला गेले. 1523 घर नंबर होता. भाडे होते रू.15 ते देखिल जड वाटत होते. मामांच्या आणि धांवेप्रमाणे 'रूजू' स्वभाव असलेने त्यांना माणसे वश होत असे. लोकांना वश करण्याचे ते एक गणपतीचा 'मंत्र' सांगत व आपणही म्हणत ओम श्री रहीं क्लीं ग्ले गं गणपतये वरवरद सर्वजनमे वशमानय स्वाहा " गुळाच्या भोवती जशा मुंग्या जमाव्यात तशी मामांच्या भोवती माणसे जमत असत त्यांत गरीबापासून अगदी देवचंद शेडजीपर्यंत सर्व माणसे असत. अब्दुल अजिजपासून तो पुरंदरे.एम्.जी. नैराकरणी जोषी 'वैययाकरणी सर्वांचा समावेश असे देवचंद कॉलेजचे सुविद्य प्राध्यापकापासून अशिक्षित शेतकऱ्यापर्यंत आपापले प्रश्न घेवून आर्तुतेने येत. एक गोष्ट विशेष नमूद करायला हवी की कुणाकडूनही ते एक पैसा घेत नसत त्या मागील भूमिका ही की माझ्या सांगण्यांत देवाचा 'प्दजपनजपवद' चा काहीतरी अंश आहे. त्याची पैशाने किंमत करता येत नाही. 7 ऑक्टोंबर 1960 चा असाच एक प्रसंग आहे. श्री क्षेत्र आप्पाचेवाडी येथील यात्रेला जाण्यासाठी षिपूरहून बैलगाड्या आल्या होत्या. 'ज्योती' व 'तुकाराम' यांची सामान भरण्याची लगबग चालली होती. मामांची तब्बेत थोडी बरी नव्हती आणि त्याचवर्षी श्री क्षेत्र आप्पाचेवाडीस संकष्टी दिवषी
गाडीची व्यवस्था करून त्यांना डॉ. पी. बी. भद्रे यांच्या दवाखान्यात साई सर्जरी लक्ष्मीपुरीमध्ये नेले. त्यावेळी कोल्हापूरात कोणतेही हार्ट स्पेशालिस्ट नव्हते. डॉ. ग्रॅट पुण्याहून महिन्यातून एकदा यायचे. मामांच्या बरोबर त्यांचा थोरला मुलगा काय तो एकटा बरोबर होता. बाकीची भावंडे लहान होती आणि आत्याबाईंना आईला सोडले नाही. त्या जीवाची (सौ. आईची) काय घालमेल झाली असेल याची कल्पना आज येते. दुसरे दिवशी आप्पाचेवाडी यात्रेचा दुसरा दिवस होता. आणि त्या दिवशी वाड्यात महारूद्राभिषेक होता. सकाळी मामांना थोडी डुलकी लागली आणि त्यांत मामांना स्वप्न पडले. अर्थात स्वप्न काय असणार त्याचा जो ध्यास होता त्याचेच स्वप्न होते. नव्हे दृष्टांत होता. श्री क्षेत्र आप्पाचे वाडी येथे महारूद्र चालला असून 21 ब्राम्हण आहेत. त्यात दोन वृध्द ब्राम्हण पेंगत आहेत. मुलाला बोलावून त्यांनी सांगितले की श्री क्षेत्र आप्पाचेवाडी येथे इतके ब्राम्हण असून त्यातील दोन पेंगताहेत. तू आप्पाचेवाडीस जा व तेथील तीर्थ व अंगारा आणून मला लाव म्हणजे माझे वीस वर्षांनी आयुष्य वाढेल. त्यांचा मुलगा श्री क्षेत्र आप्पाचेवाडीस जावून आला. मामांनी सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी होत्या. तिथला अंगारा व तीर्थ आणले. त्यांनी दिले गेले. हळूहळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. डॉ. भद्रे पी. बी. यांची तर मामांच्यावर निस्सीम श्रध्दा त्यांत एक प्रसंग घडला. डॉ. पी. बी. भट्रेंना सत्पुरूषाची दर्शन घेण्याची आवड होती. श्री हालसिध्दनाथांचा एक अवलिया भक्त नव्हे. एक प्रेषितच कोल्हापूरला आले होते. त्याला बाळूमामा महाराज असे लोक संबोधित. त्यांच्या दर्शनाला डॉ. पी. बी. भद्रे गेले. व त्यांनी त्यांना नमस्कार केला व आपल्या धनगरी भाषेत बाळूमामा त्यांना म्हणाले, कोण रे हयो ! त्यानंतर कुणीतरी त्यांना सांगितले. हे कोल्हापूरचे प्रसिध्द सर्जन डॉ. पी. बी. भद्रे त्यावर बाळूमामा डॉ. भद्रेचा हात हातात घेत
डॉक्टर अगोदर मामांना तपासत मामांना नमस्कार करून दर्शन घेत मग पुढे राऊंड घेत असत. पुढे मामा वीस वर्षे आजारी होते. त्यांना दम्याचा त्रास होता. नेहमी त्यांची छाती भरायची आणित ते अंथरूणाला खिळायचे. त्यांचा मुलगा आता बी. ए. झाला होता आणि त्याला विद्यामंदिर निपाणी येथे नोकरी करणे भाग पडले होते. वरचेवर लागणाऱ्या औषधामुळे घरखर्च वाढला होता. वर्षातून एकदा मिळणारे उत्पन्न (शेतीचे) तोकडे पडत होते. पण देवाचीच योजना डॉ. गौतम शहा, डॉ. पीटर, डॉ. सातवेकर व डॉ. बी. जी. कुलकर्णी (बेळगाव) हे त्यांच्या हाकेला ओ म्हणणारे होते
एकदा मामांना बॉन्काटीस झाला होता. छाती भरून गेली होती. इतक्यात डॉ. बी. जी. कुलकर्णी यांचा बेळगावहून फोन आला. मामा, तुम्ही ६ ारात आहात ना?, मला तुम्हाला भेटायचं आहे. यावर मी घरीच आहे येताना स्टेथास्कोप घेऊन या मी आजारी आहे असे मामांनी सांगितले डॉक्टर तासा दोन तासात आले. बघताचा मामांना जोराचा बॉन्काटीस झाला होता. त्याचे रूपांतर प्नेमोनिया मध्ये होणे अवघड नव्हते. ते मामांना म्हणाले तुम्हाला अॅमिनोफायलीनची इंजेक्शने अतिशय गरजेचे आहे. निपाणीमध्ये कोणत्याच मेडिकल स्टोअर्समध्ये अमिनोफायलीनची इंजेक्शन नव्हती. त्यावर डॉक्टर म्हणाले, माझेकडे आहेत. पण ती बेळगावला. पण इथे पोहोचायची कशी. इतक्यात निपाणी टेलिफोन एक्सचेंजचे वरिष्ठ अधिकारी पाटील म्हणून मामांना भेटायला आले होते. तो हा संवाद ऐकत होते. ते एकदम म्हणाले, डॉक्टर तुम्हाला बेळगावला जायला किती वेळ लागेल?, एक तास ते दीड तास ! डॉक्टर म्हणाले. धरा दोन तास तुमच्या दवाखान्याचा पत्ता कसा? तुम्ही काय करणार?, डॉक्टरांनी विचारले. डॉक्टर दोन तासांनी तुमच्या दवाखान्यात टेलिफोन एक्सचेंजचा माणूस येईल. त्याचेकडे मामांच्याकडे घेऊन येईल आणि त्याप्रमाणे झाले 5-6 तासात इंजेक्शने आली. डॉ. गौतम शहांनी ती दिली, मामा दोन दिवसांत हिंडू फिरू लागले. मामांना आता मुलींच्या लग्नाची काळजी लागली होती. पण श्री नाथांच्या कृपेने तिघींनाही उत्तम स्थळे मिळाली व मामा निश्चित झाले. 1967 साली मामांच्या थोरल्या मुलाचे ही लग्न झाले. धाकटा मुलगा बी. डी. एस. शिकायला मुंबईला गेला. त्याने प्रेमविवाह केला. मामांना ते प्रथम पसंत नव्हते. पण पुढे आगतिकतेने त्यांनी ते मान्य केले. मामांना पिशवीतील दूध आवडत नव्हते. म्हणून त्यांनी निपाणीच्या लहान घरात एक म्हैस बाळगली होती. तिचे धारोष्ण दूध त्यांना आवडे. त्या म्हैशीवर मामांचा फार लोभ होता. घरात शेकड्यांनी शेंग पोती यायची तर त्याची बोंडके (बारीक्या शेंगा) म्हशीला खायला घालायचे. त्यांची सौभाग्यवती म्हणायची "बाजाराला पैसे देताना काकू करतात, पण म्हैशीला सैल हातांनी देता!" मामाचे आवडीचे तीन विषय एक शेती, दुसरा देव तिसरा चालू राजकारण या तीन विषयांवर विशेषतः आपल्या अराध्य देवतेचे अनुभव सांगताना ते तहान भूक हरवून बसत व बोलत. गीतेमध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगताना पहिला गुण सांगितला आहे तो 'अमानित्वाचा. आपली प्रसिध्दी होऊ नये याची ते लोक काळजी घेतात. स्वतःचा मान सन्मान करून घेणे त्यांना अतिशय वर्ज्य असते. 'वेडेवी माजे दडे, महिमे येणे असे ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. मामांच्या जीवनातील त्यांचा वेगळा एक पैलू दाखविणारा हा पैलू आहे. अब्दुल अर्जाण नावाचे एक मुसलमान गृहस्थ मामांचे चाहते होते. ते रोज मामांच्या घरी येऊन गप्पा मारीत बसत असत. मामा कोणाला काय सांगतात, लोकांची मामांच्या विषयी काय भावना, त्यांचा दिनक्रम कसा काय, उपासना करतात याचे बारीक निरीक्षण करून
घरांतल्या लोकांना थांगपत्ता लावू दिला नाही त्यांना मामांचा सत्कार करायचा ठरविला. अगदी देवचद शेठजींच्या हस्ते हार घालून सत्कार करायचा बेत त्यांनी आखला. त्यासाठी त्यांनी वर्गणी गोळा केली. मामांचे नाव सांगितल्यावर कुणीही पैशाला नाही म्हटले नाही. ज्या दिवशी सत्कार करायचा होता त्याच्या आदल्या दिवशी श्री गलगलेकरांच्या कडून त्यांना ही कुणकुण लागली. मामा अब्दुल अर्जाणवर इतके भडकले की रागाने थरथर कापू लागले अब्दुल अर्जाणना बोलावून आणले आणि त्यानी जाब विचारला की कोणी हा उपव्दाप तुम्हाला सांगितला होता आणि मला पुसट कल्पना तरी द्यायची तुम्ही काय काय केले ते सांगा, कोणाकडून किती पैसे घेतलेत ते. त्यांनी यादी पुढे टाकली आणि शरमेने मान खाली घालून बसले. त्यांना असे काय होईल याची कल्पना नव्हती. ती यादी घेऊन त्यांनी आपला थोरला मुलगा मधू याचेकडे दिली व घेतलेले पैसे प्रत्येकाचे परत करून ये आणि असा काही कार्यक्रम नाही असे लोकांना सांग, तो पर्यंत मी जेवणार नाही म्हणून त्यांनी निघून सांगितले. घरातल्या सर्वांना अभिमान वाटावा असा त्यांचा निर्णय होता आणि अब्दुल अर्जाणकडे बघून म्हणाले, "असा उपव्दाप करणार असाल तर माझे दार तुम्हाला बंद आहे' हे लक्षात ठेवा. त्यांचे मुलांनी सर्वांचे पैसे परत केले व दोघेही बाप-लेक संध्याकाळी 5 वाजता सकाळचे जेवण जेवले, नव्हे सर्वजणच त्यावेळी उपाशी होते. असा झाला साजरा त्यांचा वाढदिवस.
जैन धर्माचे एक मोठे श्रावक निपाणीस आले होते. त्यांचे नाव होते पद्मासागरजी. ते जैन बस्तीत उतरले होते. अतिशय आचारसंपन्न व विव्दान व मान्यता पावलेले असे ते सत्पुरूष होते. मामांची त्यांची एकदा न चुकता जाऊ लागले. पद्मासागरची बोलावूनही भागवताच्या घरी जात नसत पण मामांच्याकडे एक भागवताचे घर आहे म्हणून आपणहून सांगून येऊन फलाहार करू गेले. एकदा त्यांच्याकडे मुंबईची काही थोर मंडळी आली होती. त्यांना भेटण्यासाठी मामांना मुद्दामहून बोलावून घेतले व त्यांच्या कुंडल्या दाखवून त्यांचे भविष्य विचारले. मामांनी ते इतके अचूक भविष्य सांगितले की ती मुंबईची माणसे खूष झाली. तेव्हा पद्मासागरीजींनी विचारले तुम्ही ज्या आप्पाचेवाडीस जाता तिथे तुम्हाला काही पैशाची मदत याचेकडून हवी आहे का? हे फार मोठे धनवान गृहस्थ आहेत. मामा त्यांना विनम्रपणाने म्हणाले, "नको आहे!" एका धनाढ्य माणसाच्या सेवेतून मला आप्पाचे वाडीस काही करायचे नाही तर तिथे येणाऱ्या गरीब भक्तांच्या रूपाया-रूपाया पध्दतीने निथळा चिरा घडावा अशी माझी इच्छा आहे. हे ऐकून 'निर्दव्द' झालेल्या या साधूपुरुषाच्या डोळ्यात टचकन पाणी आहे. ते गद्गदलेल्या आवाजांत मामांना म्हणाले, "मामा! तुम्हाला माहित आहे हे कोण आहेत ते?" हे दर दररोज (त्यावेळी) सात लाख मिळकत असलेले टाईम्स ऑफ इंडियाचे मालक श्री. अशोक जैन ! तुमच्या निःस्पृहतेने ती हलून गेलो. मामांच्या जीवनात अनेक नाथकृपांकित घटना घडल्या आहेत. त्या सगळ्या विस्तारभयास्तव इथे सांगता येत नाहीत. घोसरवाड येथे रथसप्तमीपासून सुरू असलेली "हालसिध्दनाथांची" बंद झालेली यात्रा घोसरवाडकर कुलकणी यांचे घरातील परत मामांनी सुरू केली व ती आज तागायत वर्धिष्णू तेजाने तळपत आहे.
मामा आता वानप्रस्थाश्रमाकडे झुकले होते. त्यांच्या एका शेवट मुलीच्या लग्नाची काय ती चिंता होती. त्यांच्या दत्तक मातोश्री कै. अंबाबाई (आत्या) यांचे ही आता निधन झाले होते.
R;k vuarkr foyhu >kY;k- 'ksoVP;k ?kVdsi;Zar R;kaps lksoGîk vksoGîkps Hkku ltx gksrs- ^ifMys oG.k bafnz;k ldyka* vls gksrs rs-
त्या अनंतात विलीन झाल्या. शेवटच्या घटकेपर्यंत त्यांचे सोवळ्या ओवळ्याचे भान सजग होते. 'पडिले वळण इंद्रिया सकलां असे होते ते. यथावकाश मामांच्या सर्वात धाकट्या मुलीचे श्री नाथांच्या कृपेने लग्न झाले. घोसरवाड येथे 'सावित्रीबाई शिंदे'च्या समाधीला दोनशे वर्षे झाली म्हणून एक मोठा यज्ञ केला होता. त्याचवेळी धाकट्या मुलीच्या सासरकडून होकार आला होता. मामा म्हणाले, 'हा मोठा शुभ शकून आहे, मी माझी मुलगी दिली अशी श्रध्देतून निर्माण झालेली निश्चयात्मक बुध्दी त्यांची झाली आणि सर्व गोष्टी यथासांग पार पडल्या. आपली परंपरा पुढे कशी चालेल याची त्यांना चिंता नव्हती. त्यांनी मुलाला लिहीलेल्या एका पत्रात त्यांनी उल्लेख केला होता, "माझी परंपरा अंशतः का होईना तू चालवशील अशी मला खात्री आहे" असे एक आश्वासक वाक्य त्यांनी लिहून ठेवले आहे.
मामांची तब्बेत आता वरचेवर बिघडू लागली. मामाचा गोतावळा मोठा होता हे खरे त्यांना ना डॉक्टर कमी ना औषध कमी, भक्तमंडळी चाहते यांची सारखी ये-जा होती. तरी शेवटी घरी ते दोघेच होते नाही म्हणायला नंदा त्यांच्या हयताचा मुलगा म्हैस राखण्यासाठी होता त्यांची मुले त्याना सारखे कोल्हापूरला चला सांगत होते. पण त्यांचे मन घेत नव्हते एकदा त्यांना 'माईल्ड हार्ट अॅटॅक आला. मग त्यांना गडबडीने हॉस्पिटलमध्ये हालविले आठ दिवसांत सर्व ठिक झाले. त्यांचा धाकटा मुलगा आता डेन्टिस्ट झाला होता. त्याची पत्नी देखील डॉक्टरच होती त्यानी राजारामपुरीत एक मोठे घर घेतले होते. तेव्हा चाणाक्ष मामांच्या लक्षात आले की, आता कोल्हापूरास जाण्याव्यतिरिक्त गत्यतर नव्हते. आणि त्यानी आवराआवर केली. म्हैस विकून टाकली आणि ते कोल्हापूरला आले. राजारामपुरी दुसरी गल्ली त्यांचा थोरला मुलगा पण जवळ असावा या कल्पनेने होते. वास्तविक डॉ. अविनाशने एका फलॅट घेतला होता पण अनेक कोल्हापूरातील प्रतिष्ठीत व श्रीमत डॉक्टरांच्यातील ऊठ-बस, त्याच्या चाललेल्या पार्ष्या, मिळत असलेला अफाट पैसा यामुळे त्याचे यश व पैसा मामांच्या डोक्यात शिरला होता त्यांचे पाय जमिनीवरच नव्हते तर परपरेमध्ये कुठे असणार? त्यांनी काहीही मुरवत न ठेवता मामाना सांगून टाकले, 'मला काही प्रत्येक अमावस्येला गाडी द्यायला जमेलच असे नाही! तुम्ही दुसरी व्यवस्था बघा पण 'सत्यसकल्पाचा दाता नारायण' असतो इचलकरंजीच्या नाना महाराज कुलकर्णी याची व मामाची ओळख झाली होती तिथे चालणाऱ्या भजनाला देखील ते गेले होते. त्याच्या मनात ही इच्छा पल्लवीत झाली की आपण मामांना दर अमावस्येला घेऊन जावे व आणून पोहोचवावे. त्याप्रमाणे ते करू लागले. मागे वळून पाहताना नाथांच्या आज्ञेने सुरू झालेल्या हया अमावस्येला अनत अडचणीतून जाण्याची कशी काय सोय झाली हे पाहिले तर लक्षात येते की या मागे काहीतरी अनामिक ईश्वरी सूत्र आहे. 1960 पर्यंत मामा सामान्य माणसाप्रमाणे श्री क्षेत्र आप्पाचेवाडीस एस टी जात व येत पुढे आजारपण आले त्यावेळी एस. टी. ने जाणे शक्य नव्हते. तर त्याचे परमभक्त श्री मारूतराव कदम त्याना आपल्या गाडीतून नेत असत व परत आणून सोडत असत पुढे एक टॅक्सी चालवणारे गृहस्थ 'श्री सुखी' यांची त्यांच्यावर श्रध्दा बसली व ते दर अमावस्येला त्याना घेऊन जात असत व आणून सोडत असत. त्यानंतर मामांची तब्बेत थोडीशी सुधारली. घरापासून स्टॅण्ड पर्यंत ते रिक्शाने जाऊत शकत होते. निपाणी डेपोमध्ये श्री. पाटील व कुलकर्णी बदलून एक एस. टी. स्टॅण्ड इनचार्ज तर दुसरे डेपो मॅनेजर म्हणून आले होते. दोघेही मामाच्याकडे काही अडचणी आल्या की विचारायला येत. येता येता मामांच्यावर त्यांची श्रध्दा बसली आणि मामांची आप्पाचेवाडीला जाण्याची अडचण प्रेमाची ताकिद की जाताना गाडीत मामा बसल्याशिवाय गाडी सोडायची नाही येतांना मामांना घेऊनच यायचे असे 1978 पर्यंत चालले? 1978 ला मामा कोल्हापूरला रहायला आले आणि कै. नाना महाराज कुलकर्णी त्यांना आप्पाचेवाडीस सोडू लागले. मला सांगा या गोष्टी घुणाक्षर न्यायाने झाल्या असतील का? का या मागे कोणाचे तरी नियोजनबध्द सूत्र असले पाहिजे. श्री नाथांचीच अदृश्य योजना हे आता लक्षात येते मामांना पूर्ण कल्पना होती की आपली आता शेवटची वेळ आली आहे म्हणून संध्याकाळच्या वेळेला युनिव्हर्सिटीमध्ये फिरायला घेऊन जाण्यासाठी त्यांच्या मित्राची गाडी यायची. ते फिरून येत. त्यांना मामा डुबळे, मुळजीबाई, तात्या पाटणे वगैरे मंडळी भेटायला येत. एकदा कुणीतरी त्याना विचारले की "मामा, तुम्ही येथे कशाकरीता आलाय?" घरच्या पायन्या चढता चढता ते म्हणाले होते "मरायला"
9.9.1980 रोजी श्रावण अमावस्या होती. ती त्यांचीच अमावस्या असलेने मामा नेहमीच्या उत्साहात होते. मामांचा जन्म 09.11.1909 सालचा. 9 हा आकडा त्यांना शुभ होता. ते त्यानी नोंदवूनही ठेवले होते. त्यानी मधी यडूरचे प्रसिध्द ज्योतिषी श्री. मोकाशी यांचेकडून 'केतू आदोलन कुंडली मांडण्याची पध्दती शिकून घेतली होती व स्वतची कुंडली मांडून आपल्या मृत्युची संभाव्य तारीख काढली होती. त्याचवेळी त्यांनी देह ठेवला मात्र अधिक मास असलेने 20 दिवसाचा फरक पडला.09.11.1909 ला त्याचे आयुष्य सपले होते. पण त्या दिवशी त्याचीच अमावस्येने तीन दिवस त्यांचे आयुष्क वाढले. 11/09/1980 रोजी "आशा नर्सिंग होम मध्ये जावून दाखवून आले. त्यांच्याबरोबर त्यांचा थोरला मुलगा होता. डॉ. एस. आर पाटीलांनी तपासले व सांगितले की सर्व काही ठाक-ठीक आहे. आता महिन्यांनी या मामा म्हणाले, डॉक्टर तुम्ही ठिक आहे म्हणता हे ठीक आहे पण माझी गॅरंटी
आणि एक पुण्यात्मा अनंतात विलीन झाला.
"कि झाकलीया घडीचा दिवा ।
काय झाला न कळे केव्हां ।
तयापरी तो पांडवा । देह ठेवी"
हा अंत नव्हता तर ही जीवनमुक्ती होती.