| |
|
| |
आप्पाचीवाडी / कुर्ली |
| |
 |
 |
 |
 |
| Appachiwadi Halsiddhanth wada murtis |
Aapachiwadi Samadhi |
Appachiwadi Dindi |
Appachiwadi Dindi
Chaitra Amavasya |
| |
|
|
|
 |
|
|
|
| Aapachiwadi Samadhi |
|
|
|
|
| |
|
| |
कुर्ली |
| |
कुर्ली हे एक थिटुकले खेडे उत्तर कर्नाटक व दक्षिण महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेले हे गांव. पण हे उत्तर कर्नाटक व दक्षिण महाराष्ट्राच्या नकाशावर आले याचे कारण कुर्लीतील दोन सत्पुरूष एक राजगिरी महाराज आणि दुसरे रेवणनाथ महाराज या दोघाच्या पुण्य पदस्पर्शाने या गावाला एक तीर्थाचे स्वरूप प्राप्त झाले या क्षेत्राच्या पुर्वेस अडिमल्लयाचा डोंगर आहे. या डोंगरावर महादेवाचे शंकराचे स्थान आहे. लोकांची अशी श्रध्दा आहे की हे श्री शैल मल्लिकार्जुनाचे स्थान आहे. आणखी एक चमत्कार याठिकाणी झाला. दत्ताच्या पादूका एका झाडाखाली होत्या. त्या दुर्लक्षित अशा अवस्थेत बऱ्याच काळ होत्या. उत्तर हिंदूस्थानातील एका सत्पुरूषाला दृष्टांत झाला आणि तो शोधत शोधत अडिमल्लायाला आला. त्या पादूका त्याला मिळाल्या आणि आज त्या पादूकांची स्थापना करून तिथे एक सुंदर देऊळ त्यांनी बांधले असून अनेक धार्मिक कार्यक्रम सध्या ते करत असून लोकांना दत्तभक्तीप्रवण त्यांनी केले आहे. त्यांचे नाव दूरवर पोहोचले आहे. त्यांच्या हस्ते कुर्ली देवस्थानाच्या मंदिराचा कळस सात आठ वर्षापूर्वी बसविला गेला आहे. सदन सारूकाच्या घरी वाढलेल्या रेवणनाथाला पहिला अनुग्रह झाला तो दत्तमहाराजांच्या अंतरंगातील एका सत्पुरुषाने कळस बसविला यांत नियतीला काहीतरी सांगायचे असेल.
जिच्या पृष्ठभागावरून पावित्राचे वारे वाहतात. त्या कुर्लीची भूमी ही पवित्र व पुण्यश्लोक झाली असल्यास नवल नाही.
हालसिध्द म्हणजेच रेवणनाथ चिखलीहून कुर्लीला आले. संध्याकाळची वेळ होती. आबांनी शेवटची फेरी म्हणत आपली नाव पाण्यात टाकली होती. तिने चिखलीचा किनारा सोडला होता. इतक्यात नाथ महाराज तिथे आले. आबांना विनवणी करून पाहिला तो काही परत येण्यास तयार होईना त्याबरोबर नाथांनी आपल्या घोंगड्याची घडी केली व त्यावर बसून ते नदीपार झाले. आबांना मोठा अचंबा वाटला, श्रीनाथ कुर्लीला आल्यावर त्यांनी राजगिरी महाराजाची गाठ घेतली. त्यांच्या बरोबर योगाच्या, अध्यात्माच्या व तपश्चर्येच्या गोष्टी झाल्या आणि कुर्ली खालील एक पालावरची वस्ती होती. त्या ठिकाणच्या चिंचेच्या बनात नाथ तपश्चर्येला निघून गेले. पुढे श्री हालसिध्दनाथ आप्पाची वाडी असे संबोधता संबोधता आप्पाचेवाडी असे वस्तीचे नाव पडले.
कुर्लीच्या या थिटुकल्या खेड्याला निसर्गाचे वरदान आहे. काजळाच्या वड्या असणाऱ्या तशा येथे सुपीक जमिनी आहेत. एका बाजूला संथ नदी वाहत आहे. तिच्या पुण्यस्पर्शाने कुर्लीचा काठ हिरवागार झाला आहे. जांभळी, आंबा, उंबराची झाडे फुललेली आहेत आणि मंद वाऱ्याने हालत हालत आवता शीतल घाटत येणाऱ्या जाणाऱ्या पांथस्थाला देत आहेत. काही ठिकाणी ठेंगणी व बैठी घरे आहेत. पाटील, शिंत्रे ही छ ाराणी पुरातन काळापासून अजून गोरगरिबांना मदत करून एका कुटूंबाप्रमाणे राहत आली आहेत. त्यामुळे गावात सुखशांती व समाधान यांचा वावर आहे. असे व्हायला कुठल्यावर दैवी शक्तीचे अधिष्ठान व तपश्चर्या कारणीभूत ठरत असते. राजगिरी महाराज, नाथ महाराजही परंपरा सध्याचे सत्परूष वसंत पाटील महाराजांचे पर्यंत अनुस्यून झालेली आहे.
कुर्ली खेडे एका अनामिक धाग्यांनी बाघले गेले आहे तो धागा म्हणजे श्री नाथाच्यावरील लोकांच्या वरील श्रध्दा इथून बाहेर पडून शिकून मोठी झालेली बुध्दिमान माणसांची देखील श्रध्दा कोमेजलेली नाही. हे दैवत इतके जागृत आहे की या मांदियाळीमध्ये सुशिक्षित, अशिक्षित |
| |
|
| |
श्री क्षेत्र आप्पाचीवाडी |
| |
श्री क्षेत्र आप्पाचीवाडी देवस्थान कोल्हापूर जवळील कागलपासून 26 किमी अंतरावर असून चिंचबनात प्रचंड घुमटीचे मंदीर, दरबारी सदर, बुरुजबंद देऊळ, हजारो भक्तमंडळी, सर्व गोष्टींनी ऐश्वर्य संपन्न असे असून कर्नाटक महाराष्ट्रात हे सिध्दस्थान विख्यात आहे. गोविंदपंत घ गोसरवाडकर आप्पाचेवाडीस दर यात्रेस येत असत.
श्री क्षेत्र आप्पाचेवाडीची यात्रा आश्विनी महिन्यात पोर्णिमेपासून सुरू होते ती पुढे पाच दिवस असते. शेवटच्या दोन दिवसात तीन भाकणूकी होतात. भाकणूक म्हणजे पाच पंचवीस वर्षात घडणाऱ्या जागतिक घडामोडींचे सूचक वर्णन असते. ते समजून घेणे आवश्यक असते. सांगण्यात एक छंद, तालबध्द भाव असतो. सांगणारा माणूस आपल्या तंद्रीत असतो. एक प्रकारची समाधी त्यास लागलेली असते.
।। नाथकृपांकित योगिनी भीमाबाई ।।
दादा जेव्हा प्रथम आप्पाचेवाडीस गेले. त्यावेळी जायला त्यांना रात्र झाली होती. ते घोडयावरून गेले होते. तेथे भीमाबाई नावाची एक वैराग्यसंपन्न स्त्री साधू होती तीने दादांचे स्वागत केले. या ब्राम्हण माणसाला काय द्यावे या विचारात ती पडली आणि तीला सुचले की यांना दूध द्यावे. सगळी भांडी पालथी घालून बघितली. पण कोणत्याच भांडयात दूध नव्हते. ती खट्टू झाली तिला काय करावे कळेना. इतक्यात एक मुलगा आला त्याने भीमाबाईस विचारले की 'तू बहू का झालीस त्यावर ती म्हणाली अरे । घोसरवाडहून एक ब्राम्हण आला आहे. त्याला दूध द्यावे म्हटले तर माझेकडे दूध संपलेले आहे. ते काग का आजी । शिक्क्यावरच्या लोटक्यात दूध आहे की गं? असे म्हणत ते त्याने तिला काढून दाखविले. मग तिच्या लक्षांत आलं ते आपण बाजूला काढून ठेवले होते ते?
ही भिमाबाई विजापूर जिल्हयातील अथणी तालुक्यातील ऐनापूरजवळच्या 'मोळा' गांवची. भीमाबाईचे पुढे लग्न झाले. ती भाजी विकून आपला संसार चालवत असे. पुढे तिला वैराग्य उत्पन्न झाले. तिने आपल्या नवऱ्याचे लग्न एका दुसऱ्या मुलीशी करून दिले व श्री क्षेत्र आप्पाचेवाडी येथे माझा ठिकाणा आहे. तू तिथे ये. आज्ञेप्रमाणे भिमाबाई पंढरपूर सोडून निघाली, मजल दरमजल करत ती खिद्रापूरला आली. टाकळी दत्तवाडहून ती क्षेत्र आप्पाचीवाडीस आली. पुढे नाथांची सेवा तिने सुरू केली व 'गाई' बाळगू लागली. एकीला दोन, दोन्हीला चार गाई होता होता दोनशे गाईंचे एक खाण्ड तयार झाले. त्यांच्या गवताची काहीतरी सोय करणे जरूरीचे होते. कागलचे राजे बापूसाहेब घाटगे कागलकर यांना पुत्र संतती नव्हती. एकदा भीमाबाईंची आणि त्यांची गाठ पडली असतां तिने ओट्यात नारळ घातला होता व पुढे वर्षाने त्यांना मुलगा झाला, तेव्हा गाईसाठी भीमाबाईने कुरण मागितले. त्याबरोबर 56 एकर कुरण भीमाबाईला महाराजांनी देऊन वंशज भीमा कृष्णा माळी सध्या नाथांच्या सेवेत रुजू आहे. त्यांचा फोटो या स्मरणीकेत दिलेला आहे. भीमाबाई ही भीमाचे वडील कृष्णा साताप्पा माळी यांची मावशी. भीमाला लहानपणापासून तिनेच जतन केला आहे.
।। नाथ दरबारातील चैतन्य सोहळा ।।
श्रीक्षेत्र आप्पाचीवाडी येथे नाथांचा राजदरबार भरतो. या भागातील अतिशय जागृत असे हे ठिकाण आहे. येथील सर्व व्यवस्था चोख व शिस्तबध्द आहे. यात्रेचा सोहळा अत्यंत प्रेक्षणीय असतो. कुर्लीची पालखी आप्पाचेवाडीस येते. त्याबरोबर शेकडो छत्र्या अबदागीर, ढोल, सासन काठ्या येतात व श्रीक्षेत्र आप्पाचेवाडीला वाड्यामधल्या देवाला भेटायला जाते. वाड्यातील मूर्ती पालखीत बसवून नटवून थटवून ठेवलेली असते. भंडारा टाकून पालखी उठवली की दोन्ही पालख्या त्या समोर असलेल्या ढोलांच्या आवाजात पुढे जाऊ लागतात..
कुर्लीची पालखी जेव्हा जेव्हा भेटायला येते त्यावेळी ती अतिशय गतिमानाने येते. एक चैतन्यवारे धावत आल्यासारखे वाटते. पूज्यपाद आद्य शंकराचार्यानी भवानीचे वर्णन करताना 'गतिस्त्वम् गतिस्त्वम् तू भवानी असे म्हटले आहे. त्याचे प्रत्यंतर येते. मोठ्या जल्लोशात ही पालखी सदरेच्या दिशेने जात असते. त्यावेळी भक्तांचे देहभान हरपलेले असते. व्यवहारिक पातळीवरचा बुरखा केव्हांच गळून गेलेला असतो. पालखी सदरेवरील देवाला प्रदक्षिणा घालून मग आत शिरते. जाताना पालखीच्यापुढे असलेले रूपेरी अलंकारांनी सजविलेले घोडे नृत्य करीत आपल्या जोषपूर्ण हालचालीने एक जल्लोषाने वातावरण निर्माण करीत असतात. श्री हालसिध्दनाथांचे हे संचारी अश्व होत. पालखी आत आल्या आल्या पूजाविधान सुरू होते. त्याला अर्धा पाऊणतास लागतो. त्या मुदतीत शेकडो भक्त ढोल वाजविण्यात दंग असतात. त्यांची एक गुणी पडू लागली म्हणजे एक प्रकारचे प्रचंड नादब्रम्ह उसळते. ढोल नाद भारून टाकणारा असतो.
।। भडारा ।।
इथे कपाळाला भंडारा लावण्याची पध्दत आहे. कपाळाला लावल्या जाणाऱ्या भंडाऱ्याने माणसाची जात-पात सामाजिक प्रतिष्ठा, मानसन्मान, स्त्री पुरूष-लहान मोठा पदवी इत्यादी सर्व गोष्टी पार पुसून जातात. भंडाऱ्याचार रंग पिवळा. पीत रंग हा गुरू मंडळाचा असतो. गुरूचा खडा पुष्कराज हा देखील पीतवर्णीय असतो. आणि नाथसांप्रदायात गुरूला अनन्य साधारण महत्व आहे.
।। नाथप्रिय वाद्य ।।
हालसिध्दनाथाना ढोल, झांजा, पावा, शृंगी वाद्ये अतिशय प्रिय. पालखीचे वेळी शेकडो ढोल एकदम वाजत असतात. तो एक ब्रम्हानाद आहे. तो बारकाईने लक्ष देऊन ऐकल्यास तो नाद 'सोहम्' सारखाच येतो. अशिक्षित अडाणी लोकांच्याकडून करवून घेतलेला तो एक सोहम् अजपाजपच आहे.
।। भक्तीसेवेचा मानकरी ।।
आप्पाचेवाडीतील सर्व कार्यक्रमाचे मानकरी ठरलेले आहेत. इतकेच नव्हे तर पालखी धरणारे मानकरी ठरलेले आहेत. पटेकरी, पोतदार इत्यादी. कमते (हिग्लजे) यांनी यात्रेचा भंडारा, पुरवावयाचा, शिंगाड्यांना दिवटी धरायची, नगारेयांनी नगारा वाजवायचा, कुणी तेल देणे, नंदादीप ठेवणे इतके नव्हे तर फुलाची गलीफ करणे, छत्र्या दुरुस्त करणारे लोहार देखील ठरलेले आहेत.
पालखीच्या पुढे तलवारीचा, गुंडाचा खेळ होतो. गोविंदपंत घोसरवाडकर यांना त्यात पहिला मान आहे. इतकेच नव्हे तर 'गुंड' हा प्रकार आप्पाचेवाडीस नव्हता. गोविंदपंतांनी (दादांनी) प्रथम आप्पाचेवाडीस 'गुंड' नेला आहे. कुर्लीचा मानकरी तेथे येऊन हत्यार खेळाचे वेळी (तरवार) देणे, गुंड देणे इत्यादी वंश परंपरेने मानाची भक्तीसेवा अतिशय भक्तीने व आदर भावनेने बजावत असतात. सध्या आण्णासाहेब पाटील, कुर्ली यांचेकडे तो मान आहे. कुर्लीच्या (विश्वस्त मंडळातील) अन्य दोन सभासद श्री. वसंत भाऊ पाटील व शिवाजी रावजी पाटील हे आहेत. तसेच शिंत्रे घराण्याची पण देवावर निस्सिम भक्ती आहे. त्यांची एक मोठी समाधारणा आप्पाच्यावाडीच्या क्षेत्रात असते आणि ते प्रत्येक कार्यक्रमात आदराने, श्रध्देने व आनंदाने अगत्यपूर्वक हजर असतात.
।। वाडीची अमावास्या सेवा–अन्नदान ।।
श्री क्षेत्र आप्पाचेवाडी येथे दर अमावस्येस लोकांची यात्रा भरते. अलीकडे ही यात्रा मोठ्या प्रमाणावर भरू लागली आहे. दर अमावस्येस घुमटात अन्नदान केले जाते. 12 भक्तांनी अमावस्या वाटून घेतलेल्या आहेत. प्रत्येक अमावस्येस साधारणपणे दोनचार हजार लोकांना अन्नदान केले जाते. जात पात सारे भेदाभेद विसरून गरीबांना अन्नदान करण्यात जो आनंद असतो. तो इथे संपूर्णतः अनुभवयास मिळतो. याचवेळी भजन-प्रवचनतणून अध्यात्मउन्नतीचे लोकांना मार्गदर्शन केले जाते. सकाळी 10 वाजलेपासून 12 वाजेपर्यंत सुशिक्षित अशिक्षित लोक इथे भक्तीभावाने जमतात. लोकांच्या मनामध्ये कित्येक वेळा अंधश्रध्दा असते. ती दूर करून त्यांना परमेश्वराच्या निखळ स्वरूपाचे दर्शन घडविणे हा यातील मूळ हेतू कोण म्हणतं 'मला चक्कर येते, देव घातलाय काय बघा?' त्यांना सांगितले जाते. देव आहेत तेवढे तेहतीस कोटीच आहेत. माणसे मात्र नव्वद कोटी झाली आहेत. प्रत्येकाच्या वाटणीस देव येतच नाही. तेव्हा देव घातलाय वगैरे कल्पना सोडून दे 'ब्लड प्रेशर' तपासून घे. औषध घे, सुशिक्षित माणसे कित्येक वेळा पथ चुकलेली असतात. गोत्यात येतात. त्यांना सन्मार्गाला लावणे धर्माची सुसंस्कार व नीतिमत्ता हीच आहे, हे मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करणे. जेणेकरून लोकांचे अष्टसात्विक जागृत होतील अशी उपासना अगर वातावरण, निर्माण करणे हाच त्या मार्गदर्शनाच्यामागील हेतू, ज्ञानेश्वरांपासून ते निळोबारायांपर्यंत, गाडगे महाराज तुकड्यापर्यंत साधुसंतांनी जे काम करून जीवांना आत्मोध्दाराचा मार्ग दाखविला ते कार्य इथे चालते. मत्सर न घडतां शांतपणे, येणाऱ्या अडचणींना, गैरसमजांना निर्धाराने तोंड देत कार्य करीत रहाणे एवढेच ध्येय त्यामागे आहे.
सेवामानकरी :
श्री हालसिध्दनाथांनी संजीवन समाधी घेण्यापूर्वी भक्तांना बोलावून दूध पिण्याची सोन्याची वाटी हातातील दंड (काठी) भंडाऱ्याची पिशवी (कामधेनू) आपले घोंगडे, ध्वज (निशाण) अशा वस्तू एकेकास देऊन सांभाळून ठेवण्यास सांगितले व भक्तांना यात्रेतील मानकरी ठरवून दिले आप्पाचीवाडी येथील श्री. आप्पाखोत (वड्ड) यांचे घरी देवाचे घोंगडे भंडाऱ्याची पिशवी व दुधाची सोन्याची वाटी दिलेली असून त्यांना येथे मोठा मान आहे. पुजारी, बोते, दिवटे, कमते, मुल्ला वगैरे सर्व सेवेकरयांना कायमची उत्पन्ने दिली आहे. रायबाग येथील धनगरांना करबांधणेचा परंपरागत मान आहे.
भाकणुकीची कृपा :
वाघापूर येथील भक्तमंडळी जंगलातून पायवाटेने महाराजांचे दर्शनास येत त्यापैकी एका घराण्यावर महाराजांनी पूर्ण कृपा करून सांगितले की, येथे मी समाधी घेतल्यावर याजागी मोठी यात्रा भरू लागेल त्यावेळी तू 'भाकणूक करीत जा, तू जे सांगशील ते ते खरे होईल' महाराजांच्या आशिर्वादाप्रमाणे आप्पाचीवाडी येथे अश्विनी नक्षत्रावर नवरात्र बसवून कर बांधली जाते. मृग नक्षत्रांवर यांत्रा फुटते. 'रोहिणी नक्षत्रावर भाकणूक होते. त्याप्रमाणे हे वाघापुरे आजही यात्रेत आजही भाकणूक करतात.
श्री हालसिध्दनाथाची भाकणूक
भाकणूक म्हणजे भविष्यकथन, वाघापूरच्या भक्ताला यावेळी देवाचा संचार होतो व तो पुढील भविष्याचे सूचक मार्गदर्शक करतो. पीकपाणी, धनधान्य, पाऊसपाणी, रोगराई, सामाजिक राजकीय परिस्थिती, युध्द, संघर्ष इ. बाबतीतही भाकणूक होते. प्रामुख्याने शेतकरी (वर्गासाठी) भक्तासाठी ही भाकणूक होते.
श्रीकृष्ण चमसनारायण – श्री हालसिध्दनाथ :
हालसिध्दांनी हस्तनक्षत्रावर समाधी घेतली असून त्यांचा जन्म रोहिणी नक्षत्रावर आहे. भगवान श्रीकृष्णांचा जन्मदेखील रोहिणी नक्षत्रावरच झाला आहे.
भगवान श्रीकृष्ण हे दशावतारातील आठवे अवतार असून श्री रेवणनाथ हेही नवनाथातील आठवे अवतार होत. श्रीकृष्णाला घोंगडी, काठी, पावा,
शृंगी, दूध, गाय, बालगोपाल या गोष्टी अत्यंत प्रिय आहेत. त्याप्रमाणेच नाथांनाही या गोष्टी प्रिय आहेत.
श्रीकृष्णावराताराप्रमाणेच धर्मसंस्थापना व भक्तोध्दार ही कार्ये नाथ करीत आहेत.
भंडारा व ढोलनाद :
रेवणनाथ महाराजांना भंडारा अत्यंत प्रिय आहे. तो या संप्रदायाचे बोधचिन्हच आहे. भंडाऱ्याची रंग पिवळा आहे. गुरूमंडळाचा रंग पीत-पिवळा असतो. तो शुध्द सत्वगुणी रंग आहे. नाथ परंपरेत गुरूमंडळास सर्वात अधिक महत्व आले.
हालसिध्दनाथास ढोल, झांजा, पावा ही वाद्ये प्रिय आहेत. विशेषतः ढोलाचा आवाज फार आवडतो. यात्रेच्यावेळी, पालखीचेवेळी शेकडो भक्त ढोल वाजवीत असतात. ढोलाचे नादात ब्रम्हनाद सामावलेला आहे. तो अनहतनाद असल्याने इतर सर्व नाद त्यात लुप्त होत जातात. 'अहंब्रहम तद्ब्रहम असाच ध्वनी त्यातील प्रत्येक ठेक्यातून निर्माण होतो. ढोल वाजविणे ही एक नाथ सेवाच आहे.
घोसरवाडी दृष्टांत दर्शन
एकदा आप्पाचेवाडी यात्रा करून श्री. गोविंदपंत दादा घोसरवाडकर परत निघाले असता एक गोरापान, उंचपुरा म्हातारा धनगर काठी टेकत टेकत अंगावरील घोंगडे सावरीत त्यांचेकडे आला व म्हणाला 'अरे, मी घोसरवाडला यावे म्हणतो येऊ का?
त्यावर 'ये की बाबा, अवश्य ये असे सांगितले. तू कुठल्या गावचा राहणारा?' असे त्याला विचारल्यावर 'मी चिखलीचा राहणारा असे त्याने सांगितले. दादांनी त्याला सहज विचारले, 'किती वर्षे झाली तिथं आहेस?' त्यावर तो म्हणाला 'मी होय, आहे की सात आठ पिढ्या व तो निध टून गेला.
काही वेळाने स्वतः देवच समक्ष आल्याचे दादांना लक्षात आले. सदर वर्णनाच्या धनगराची चौकशी केल्यावर चिखलीत कोणतीही व्यक्ती आढळली नाही. कौल लावल्यावर देवाने स्वतःच आल्याचे सांगितले
त्यावेळेपासून घोसरवाड येथे मोठ्या उत्साहाने उत्सव साजरा होऊ लागला व यात्रा मोठ्या प्रमाणात होऊ लागली |
| |
|
| |
How to Reach Appachiwadi
:
Mumbai Pune
Satara Kolhapur Kagal After
the RTO Check post, before the Overbridge, you can see the
Welcome board (Kamaan) of
Appachiwadi
Appachiwadi Google Location :
Click Here
Appachiwadi's Pin Code
is 591241
Kurli :
Kurli is
situated in Belgaum District , Karnataka .
Kurli's Pincode is
591241 |
|
|