नूतन मूर्तीबदद्ल कौल :
श्री सिध्देश्वराला नुतन मूर्ती करणेबदद्ल आम्ही कौल लावला आणि सिध्देश्वराने आम्हाला परवानगी दिली सर्वानुमते हा कार्यक्रम करण्याचे निश्चित केल्यावर आम्ही आप्पाचेवाडी येथे जाण्यास निघालो बरोबर गावकरी, पुजारी व मानकरी होत - तेव्हा सरस्वतीचा कृपाशीर्वाद-गोसरवाडमधून आम्ही सर्वजन निघालो बोरगावच्या जरा पुढे जातो तो एक सुंदर मोर पिसारा फुलवून रस्त्यामध्ये आडवा उभा राहिला होता. गाडी थांबविली गाडीतील एकजण म्हणाला की, 'मोर हा सरस्वतीचे वाहन आहे आणि मोर आडवा आला म्हणजे आपल्या कार्याला शुभशकूनच झाला प्रत्यक्ष श्री सरस्वतीने आशीर्वाद दिला आहे"
देवाच्या मिरवणूकीसाठी हत्ती - श्री गणेशाची कृपा - दिनाक 03/08/97 रोजी आम्ही या समारंभाच्या निमंत्रण पत्रिका घेऊन आप्पाचीवाडी, कुर्ली, नणदी वगैरे ठिकाणी बरोबर भंडारा घेऊन निघालो बेडकिहाळ येथे सिध्देश्वराच्या मूर्तीच्या मिरवणूकीसाठी हत्ती ठरविणेचा आमचा विचार होता. आम्ही बेडकिहाळजवळ आलो तर रस्त्यात हत्ती तेथेच निघाला होता आमची गाडी हत्ती जवळ जाताच तो गजराज आमच्या गाडीसमोर येऊन ऊभा राहिला हा देखील मोठा शुभशकूनच घडला प्रत्यक्ष विघ्नहर्त्या गजाननांने आम्हाला रस्त्यात समोरे येऊन आशिर्वाद दिला. बरोबरची माणसे म्हणून लागली. "बघा! आपण हत्ती शोधत आहोत, तर इथे प्रत्यक्ष हत्तीच आपल्या समोर येऊन उभा राहिला आहे" आम्ही लगेच गाडीतून उतरून आमच्या जवळची खोबऱ्याची वाटी तोंडात घातली व नमस्कार केला तोच हत्ती आम्ही बेडकीहाळमध्ये जाऊन मिरवणुकीकरिता ठरवून आलो. घोसरवाडच्या लोकांची इच्छा होती की, अंबारीतून श्री सिध्देश्वराच्या नवीन मूर्तीची मिरवणूक निघावी तर हत्तीने समोर येऊन जणू श्री गणेशाची इच्छाच प्रकट केली अशा रितीने मंगलमूर्ती गणेशासह सर्व देव देवताही श्री सिध्देश्वराच्या नवजन्माच्या सोहळ्यात सहभागी झाले असे समजायला हरकत नाही.
श्री सिध्देश्वराच्या मूर्तीकाराने हे काम अत्यंत तळमळीने, सचोटीने व पूर्ण पावित्राने सोवळ्यात पार पाडले आहे
सावित्रीदेवीच्या आशीर्वादाची कवचकुंडले :
साध्वी पतिव्रता सावित्रीदेवीच्या कृपेची कवचकुडले आमच्या अगावर आहेत म्हणूनच आम्ही "बाबा!" हा आमचा मान हीच आमची श्रध्दा, मातोश्रींनी ती राखली आणि आमचे पूर्व पुण्य फळास आले. आम्ही धन्य झालो। सात पिढ्यांसाठी श्री नाथ महाराजांनी दिलेली ही भाक पुढे सांभाळण्याचे ठरविले. आज आमच्या नवव्या पिढीला त्यानी हे मूर्तीस्थापनेचे प्रेरणाभाग्य प्रदान केले आहे.
स्मरणिकेचा आदेश :
श्री सिध्देश्वराच्या मूर्ती नुतनीकरणाबद्दल कौल लावला आणि सिध्देश्वराने कौल दिला तसेच स्मरणिकेच्या सदर्भात देखील देवाचीच आदेशवाणी झाली श्री सिध्देश्वराच्या मस्तकावर श्री बाळू पुजारी याने ओजळभर जाई-जुईची फुले वाहली तेव्हा उजव्या बाजूने ती फुले ओघ ाळत खाली आलेली सर्वांनी पाहिली हा शुभशकून सर्वांनाच प्रमाण ठरला तेव्हा भंडारा-नारळ डॉ सौ अनुराधाताईच्या ओटीत घालून त्याना स्मरणिकेच्या कामास सुरूवात करण्यात देवाने सांगितले. श्रीक्षेत्र कारिकोळ येथे देखील संचारात देवाने “सरस्वती को बुलाओ।" असे म्हणून नारळ व भंडारा दिला ही देवाची इच्छा होय.
कारिकोळ येथे मंदीर बांधले :
कारिकोळ हे तिकोटे तालुक्यातील गांव असून पूर्वी ते कुरूंदवाड संस्थानचे हद्दीत येत असे कारिकोळ कोटे येथे बाळाजीपंत डफळापूर हे मामलेदार म्हणून त्यावेळी काम करीत असत.
कारिकोळ येथे श्री हासिध्दनाथांचे एक छोटे देऊळ होते ते जागृत देवस्थान असल्यामुळे असख्य भक्त या देवास येत नागाप्पा धनगर हा देवाचा पुजारी होता. त्याने एकदा संचारात बाळाजीपंतास "हालसिध्दाप्पाचे देऊळ बाघ म्हणजे तुझी व्यथा नाहीशी होईल" असे सांगितले. बाळाजीपतास मुळव्याधीची अत्यंत त्रासदायक अशी व्यथा होती बाळाजीपतही देवाचे भक्त होते त्यानी कारिकोळ येथे श्री हालसिध्दांचे मोठे देऊळ बांधले व देवास नंदादीप ठेवला देऊळ पूर्ण होताच बाळाजीपंताची सर्व व्यथा नाहीशी झाली.
केला नेम चालवी :
बाळाजीपंत डफळापूरकर तिकोटे येथे राहून आपले काम पहात असत. त्यांच्या पत्नीची या देवावर अलोट श्रध्दा होती. त्या तिकोट्याहून चार मैल चालत जाऊन दर रविवारी देवाचे दर्शन घेऊन येत असत व मगच अन्नग्रहण करीत असत.
एका रविवारी बाळाजीपत व गावचे पाटील सकाळीच बुध्दीबळ खेळण्यास बसले जेवणाची वेळ टळून गेली तरी खेळ संपेना, इकडे त्यांच्या पत्नीला देवदर्शनास जाण्याची ओढ लागलेली होती. खेळ पूर्ण करून बाळाजीपताना जेवण आटोपण्यास बराचवेळ लागला डोक्यावर सूर्य चांगलाच तापत होता. अशा परिस्थितीतच उपाशीपोटी देवदर्शनासाठी बाळाजीपंतांच्या पत्नी अनवाणी निघाल्या पायास व डोकीस चटके बसू लागले जीव कासावीस होऊन भोवळ येऊन त्या रस्त्यातच पडल्या.
त्यावेळी तिकोट्याच्या पाटलासारखाच वेश असलेला एक गृहस्थ आपला घोडा घेऊन लगबगीने तेथे आला. व त्यांना म्हणाला 'बाळाजीपंतानीच मला घोडा घेऊन पाठविले आहे. त्या घोड्यावर आपण बसा व कारिकोळला चला'
त्यावर त्या म्हणाल्या माझा चालत जाण्याचाच नियम आहे देवाचे दर्शन झाल्याखेरीज मी घोड्यावर बसणार नाही त्यानंतर त्या हळूहळू उठल्या व मोठ्या कष्टाने कारिकोळास जाऊन पोहोचल्या देवदर्शन घेतले व मग घोड्यावर बसून तो मनुष्य तिकोट्यापर्यंत आला. वाडा जवळ येताच, तो म्हणाला, 'मी घोड बाधून येतो तोवर तुम्ही पुढे व्हा !"
बाई आपल्या घरी येऊन पाहतात तो सोप्यावरच आपले मालक व तिकोट्याचे पाटील बुध्दीबळाच्या खेळात रमलेले तेव्हा आश्चर्याने त्या म्हणाल्या, 'मी घोड बाधून येतो तुम्ही पुढ व्हा असे आत्ताच तर सांगून घोड बांधायला गेलात आणि इकडे येउन डाव केव्हा मांडलात?”
तेव्हा बाळाजीपतानी आपण सकाळपासून बुध्दीबळच खेळत असल्याचे सांगितले तेव्हा त्या बाईनी घडलेला प्रकार त्या दोघाना सागितला. यावरून भक्तसंकटी देव कसे रक्षण करतो हे दिसून येते.
नंदादीपाची प्रचीती :
बळवंतराव डफळापूरकर याचे चिरजीव माधवराव याना श्री गोविंदपत घोसरवाडकर दादा यांची मुलगी गोदूताई दिली होती. गोदूताईस लागोपाठ सात, आठ मुलीच झाल्या.
एकदा कारिकोळास गेल्यावर दादाना संचार झाला असता तेथील पुजाऱ्याना माधवरावाना मुलगा कधी देणार? असे देवाने सांगितले. तेव्हा 'देवापुढचा नंदादीप बंद पडला आहे तो सुरू कर मग मुलगा देतो असे देवाने सांगितले. माधवरावांनी 'मुलगा दे नंदादीप ठेवतो म्हणल्यावरही देवाने 'नदादीप ठेव मुलगा देतो असे देवाने सांगितले तेव्हा एका पाटलाने नंदादीपाची हमी घेतली व श्रीफळ प्रसादाने माधवरावांना मुलगा होताच त्यांनी नंदादीप ठेवला आजतागायत हा नंदादीप सुरू आहे.
आप्पाचेवाडीस देव वास्तव्यास आले :
घोसरवाडहून नाथ महाराज आप्पाचीवाडी येथे आले. त्याआधी निपाणीच्या आसपास त्यांचा विचार होता. त्यावेळी महाराजांना भूक लागताच गाईच्या स्तनांतून आपोआप धारा स्त्रवू लागत. महाराजांसाठी भाकड गाईसुध्दा दूध देऊ लागल्या
यानंतर आपण आप्पाचेवाडी येथेच वास्तव्य करावयाचे ठरवून चिखलीवरून ते आप्पाचे वाडीस आले. वाटेत वेदगंगा नदीस पूर आला होता. नावेशिवाय पलीकडे जाणे अशक्य होते. म्हणून त्यांनी नावाड्यास नदीपलीकडे पोहचवण्यास सांगितले. पण त्यांनी नकार दिला. तेव्हा श्रीनाथ महाराजांनी आपल्याजवळचे घोंगडे पाण्यावर टाकले व त्यावर बसून ते पैलतीराला गेले.
नाथांची संजीवन समाधी :
दक्षिण काशी श्रीक्षेत्र ज्योतिबा हे महाराष्ट्रातले प्रसिध्द तसेच प्राचीन दैवत आहे. एकदा या देवालयामधील मूळ लिंग मूळ ठिकाणापासून बाजूस सरकले. ते पूर्ववत स्वस्थानी यावे म्हणून असंख्य भक्तांनी खूप जप-तप-अनुष्ठाने केली. हिंदुस्थानातले मोठमोठे राजेरजवाडे यांनी पूर्वपुण्याई पणाला लावूनही कोणास यश आले नाही.
श्री हालसिध्दनाथांच्या कृपाप्रसादाने ज्यांचा जन्म झाला ते निपाणीकर सरकारांचे चिरंजीव श्री आप्पासाहेब हे त्यावेळी महाराजांचा आशिर्वाद घ् ोऊन हे काम करण्यासाठी ज्योतिबास गेले. पण जाताना महाराजानी त्यांना सांगितले की, 'तुझ्या हस्ते ते लिंग मूळ स्थानी बसेल जमलेले लोक तुझी मिरवणूक काढतील पण ती मिरवणूक तू काढून घेऊ नकोस.'
श्रींच्या आदेशाप्रमाणे आप्पासाहेबांनी ज्योतिबास जाऊन विधीपुर्वक पूजा प्रार्थना केली. तेव्हा काय आश्चर्य! 'ज्योतिर्लिंग पूर्वीच्या ठिकाणी आपोआपच जाऊन बसले. ही अलौकिक, अद्भूत दैवी घटना पाहताच जमलेल्या सर्वांना आनंद झाला व त्यांनी आप्पासाहेबांना उचलून अंबारीत घालून त्यांची मोठी मिरवणूक काढून सोहळा साजरा केला.
तिकडे ज्योतिबाचे लिंग मूळस्थानी स्थापन होताच इकडे त्याचक्षणी नाथानी संजीवनी समाधी घेतली. आप्पासाहेब निपाणीकर परत आले तेव्हा त्यांना दृष्टांत देऊन सांगितले की, याच ठिकाणी राहून मी भक्तोध्दाराचे कार्य करीन पुढे निपाणीकरांनी तेथील देवस्थानास व समाधीस्थानास इनामे देऊन पूजा अर्चेची व्यवस्था केली.
ज्योतिबा व आप्पाचेवाडी यांच्या यात्रेत समान वैशिष्ट्ये आहेत. हस्त नक्षत्रावर ज्योतिबाची पालखी फिरते. त्याच नक्षत्रावर पूर्वी इकडे नाथांनी संजीवन समाधी घेतलेली आहे. तसेच याच तिथी व नक्षत्रावर श्रीक्षेत्र आप्पाचीवाडी येथे घुमटात समाधीवर महावस्त्र (गलिफ) घातले जाते. मोठा उत्सव होऊन महाप्रसाद वाटला जातो.
Mr. Prithviraj Patil.
London
श्री हालसिध्दनाथांच्या कृपेमुळे मी आज परदेशामध्ये आहे. मी हालसिध्दनाथाची नियमित पुजा आणि स्मरण करतो. सन 2009 मध्ये मला इंग्लंड देशाचा विसा नामंजूर झाला होता आणि कारण होते पुरेसे पैशांचा अभाव, त्यानंतर मी वाघापूर येथील श्री भगवान धोने यांना भेटून श्री नाथांना कौल लावला. धोने महाराजांनी सांगितले की एका आठवड्याचा आत्ता तुला पैशांचे आयोजन होईल. 2-3 दिवसात मला एक व्यक्ती भेटला, मी माझी समस्या कथन केली आणि पहिल्या भेटीमध्ये तो माणूस मला पैसे द्यायला तयार झाला. कोणतेही कागद, बॉडपेपर न करता मला त्या माणसाने 2 लाख कॅश आणि 3 लाखांचा चेक बरोबर स्वतःचे कागदपत्रे दिलीत. हे सर्व नाथांच्या कृपेमुळे पार पडले. त्यानंतर माझा इंग्लंडचा विसा मंजूर झाला. ओम चैतन्य सद्गुरु श्री हालसिध्दनाथाय नमो. |